नाशिक : महाराष्ट्रातील दोन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी दि. १० जून रोजी मतदान होणार आहे.
सन २०२४ हे पूर्ण वर्ष निवडणुकांचे आहे. देशभरात सध्या लोकसभा निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. निवडणुकीचे तीन टप्पे पूर्ण झाले असून, चौथ्या टप्प्यात दि. १३ मे रोजी मतदान होणार आहे. नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघांत पाचव्या टप्प्यात दि. २० मे रोजी मतदान होणार आहे. त्या पाठोपाठ आता शिक्षक मतदारसंघ, विधानसभा, महापालिका व जिल्हा परिषदेसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी पुढील काही महिन्यांतच निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
मुंबई आणि कोकण विभाग पदवीधर मतदारसंघासह नाशिक व मुंबई शिक्षक मतदारसंघातील विद्यमान आमदारांची मुदत दि. ७ जुलै २०२४ रोजी संपत आहे. त्या अनुषंगाने केंद्रीय निवडणूक आयोगाने संबंधित चार मतदारसंघांमध्ये निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघातून सध्या किशोर दराडे आमदार आहेत. त्यांचा कार्यकाळ संपत असल्याने नाशिक विभागातही निवडणूक प्रक्रिया राबविण्यास सुरुवात झाली आहे. निवडणुकीबाबतची अधिसूचना बुधवारी (दि. १५) जारी झाली.
Related News
Mumbai डोंबिवली: भटक्या कुत्र्याच्या चाव्याने ५ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, प्रशासनावर प्रश्नचिन्ह
डोंबिवली, Mumbai – शहरातील भटकी कुत्र्यांच...
Continue reading
Mumbai : वरळी सी फेसवर डॉल्फिन्सचं दर्शन, मुंबईकरांची उत्स्फूर्त गर्दी
Mumbai म्हणजे सतत धावपळ, लोकलची गर्दी, वेळेच्या मागे धावणारी माणसं आणि कधीही न ...
Continue reading
Mumbaiत दादरमध्ये तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा, अग्निशमन दलाने वाचवले
Mumbai तील दादर रेल्वे स्थानक परिसरात शुक्रवारी पहाटे एका तरुणाने केलेल्या कृत्यान...
Continue reading
लिओनेल मेस्सीचा भारत दौरा आणि वानखेडे स्टेडियममधील जंगी स्वागत
फुटबॉलच्या दुनियेत लिओनेल मेस्सीचं नाव एखाद्या देवासमान आहे. अर्जेंटिनाला आपल्या ...
Continue reading
गिरीश महाजन यांना एवढी मस्ती की… अंजली दमानिया यांचा तोल सुटला; नाशिक ते मुंढवा प्रकरणावरून सरकारवर घणाघाती हल्ला
नाशिकमधील तपोवन वृक्षतोड आणि पुण्या...
Continue reading
नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील भरड्याची वाडी येथे आदिवासी कुटुंबाशी संबंधित एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका 45 वर्षीय महिलेवर आरोप आहे...
Continue reading
रोहित पवारांच्या निकटवर्तीयावर ईडीची मोठी कारवाई; बारामती–पुण्यात ५ ठिकाणी धाड, १०८ कोटी फसवणूक प्रकरणात हालचाल वेगवान
बारामती–पुण्यात ईडीचा सक्त वसुलीचा शिकंजा अधिक घट्ट; राजकीय ...
Continue reading
प्रकाश आंबेडकर निवडणूक निकाल पुढे ढकलल्याबाबत आपले विधान करत सर्व राजकीय पक्षांना आवाहन केले आहे. नागपूर खंडपीठाचा निर्णय चुकीचा असल्याचे त्यांन...
Continue reading
नाशिकमध्ये जबरी चोरीचा थरारक गुन्हा उघडकीस; रेकॉर्डवरील गुन्हेगार जेरबंद
स्थानिक गुन्हे शाखा युनिट क–2 ची भरीव कामगिरी
नाशिक शहरात दिवसेंदिवस वाढत असले...
Continue reading
नाशिक : आडगाव मेडिकल फाटा परिसरात अतिक्रमण, रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या रिक्षा आणि वाढती वाहतूक यामुळे हा चौक अपघातप्रवण ठरत असून येथे दररोज किरकोळ अपघातांच्या घटना घडत आहे...
Continue reading
Rami हॉटेल ग्रुपला मोठा झटका; आयकर विभागाचे सर्च ऑपरेशन सुरू
मुंबई: प्रसिद्ध Rami हॉटेल ग्रुपला मोठा झटका बसला आहे. आयकर विभागाने आज (मंगळवार) पहाटेपास...
Continue reading
नाशिकमध्ये पैशांवरून वाद आणि त्रिपल तलाक प्रकरण उघडकीस; बिहार आणि कॅनडातून पतीने पाठवले पत्र, पत्नीवर शारीरिक व मानसिक छळ; मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा...
Continue reading
…हे मतदानही सोमवारी
नाशिक आणि दिंडोरी लोकसभेसाठी सोमवार, दि. २० मे रोजी मतदान घेण्यात येणार आहे. उन्हाचा वाढता तडाखा आणि सलग सुट्ट्यांमुळे मतदानाची टक्केवारी घसरण्याची भीती जिल्हा प्रशासनानेदेखील व्यक्त केली आहे. आगामी निवडणुकांचे मतदान सलग सुट्ट्यांना लागून येऊ नये, असे विनंतीपत्र जिल्हा प्रशासनाने यापूर्वीच निवडणूक आयोगाला दिले होते. परंतु, तरीही शिक्षक मतदारसंघाची निवडणूकदेखील शनिवार, रविवारच्या सलग सुट्टीला लागून सोमवारीच घेण्यात येणार आहे.
…असा आहे निवडणूक कार्यक्रम
निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्धी- दि. १५ मे
नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची अंतिम मुदत- २२ मे
नामनिर्देशनपत्रांची छाननी- २४ मे
नामनिर्देशनपत्र माघारीची मुदत- २७ मे
मतदानाचा दिनांक- १० जून
मतदानाची वेळ- सकाळी आठ ते दुपारी चार
मतमोजणीचा दिनांक- १३ जून
एकूण निवडणूक प्रक्रिया पूर्ण होण्याचा दिनांक- १८ जून
नाशिक विभागातील शिक्षक मतदार संख्या
जिल्हा मतदार
नाशिक २३५९७
अहमदनगर १४६४८
जळगाव १३०५६
धुळे ८०८८
नंदुरबार ५४१९
एकूण ६४८०८