दानापूर : मा.शिक्षणाधिकारी माध्यमिक, जि.प. अकोला आणि महाराष्ट्र इंग्रजी शिक्षक संघटना (मेटा) यांच्या वतीने डॉ. गोपाळराव खेडकर महाविद्यालयात तालुकास्तरीय इंग्रजी वकृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.या स्पर्धेत मराठी माध्यमाच्या गटातून प्रथम क्रमांक पटकावला कु. पंखुडी घनश्याम फाफट (हनुमान प्रसाद साह जनता विद्यालय, दानापूर) यांनी तर ब गटातून द्वितीय क्रमांक मिळविला कु. आस्था भटकर यांनी. या विद्यालयातून एकूण दोन विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला होता.स्पर्धेत गट अ साठी विषय होता “जलसाक्षरता: काळाची गरज” तर गट ब साठी “जीवनातील विनोदाचे महत्त्व”. या विजयी विद्यार्थ्यांना जिल्हास्तरीय इंग्रजी वकृत्व स्पर्धेसाठी श्री. शिवाजी हायस्कूल, हरिहर पेठ, अकोला येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी निवडण्यात आले आहे.विजयी विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय हनुमान प्रसाद साह जनता विद्यालयाचे व्यवस्थापक डॉ. अजय विखे, मुख्याध्यापक श्री. डाबरे, पर्यवेक्षक श्री. गावंडे, शिक्षक श्री. ताले, श्री. धोरण, श्री. चवंडकार, श्री. भड, श्री. राठोड, श्री. डाबरे आणि आपल्या आई-वडिलांना दिले आहे.
read also : https://ajinkyabharat.com/gharul-yadit-yadit-arbitrary-benefits/
