पंजाबविरुद्ध झालेल्या सामन्यात चेन्नई फॅन्सची निराशा झाली.
या सामन्यात धोनी अंतिम षटके शिल्लक असताना मैदानात उतरला होता पण शेवटच्या चेंडूवर दोन धावा करत असताना बाद झाला. या आधीच्या सामन्यात धोनी नाबाद राहिला होता.
पण यंदाच्या हंगामात धोनीबाबत ही एक गोष्ट पहिल्यांदाच घडल्याचे पाहायला मिळाले.
बुधवारी पंजाब किंग्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्स असा सामना झाला.
ज्यात चेन्नई प्रथम फलंदाजीस उतरली ऋतुराजच्या दमदार खेळीनंतर धोनी फिनिशींगसाठी मैदानात उतरला परंतु पंजाबने चेन्नईला १६२ धावांतच रोखले. याआधी धोनीने सात सामने खेळले आहेत.
त्यात त्याने २५९.४६ स्ट्राइक रेटने फलंदाजी करत ९६ धावा केल्या आहेत व सर्व सामन्यात नाबाद राहिला होता.
पण पंजाबविरुद्ध झालेल्या सामन्यात काही वेगळेच चित्र पाहायला मिळाले. धोनी १२७.२७ स्ट्राइक रेटने फलंदाजी करत ११ चेंडूत १४ धावा केल्या व अंतिम चेंडूवर २ धावा करण्याच्या प्रयत्नात रन-आऊट झाला.
धोनी पंजाबविरुद्ध सामन्यात सातव्या क्रमांकावर मैदानात उतरला होता. धोनी १९ व्या षटकात फिरकी गोलंदाज राहुल चहरसमोर थोड्या अडचणीत असल्यासारखे दिसत होते.
२० व्या षटकात अर्शदीप सिंग गोलंदाजी करण्यास उतरला त्याच्या पहिल्याच चेंडूवर धोनीने चौकार मारला.
शेवटचा चेंडू अर्शदीपने लो फुलटॉस टाकला धोनीने षटकार मारण्याचा प्रयत्न केला पण हर्षद पटेल झेल घेण्यास असमर्थ ठरला.
हर्षल पटेल चेंडू पकडताना थोडा गडबडला त्यामुळे धोनीने अजून एक धाव घेण्याचा प्रयत्न केला. पण हर्षलने पटकन चेंडू उचलत विकेटकिपरच्या दिशेने फेकला तिथे जितेश शर्मा उभा होता.
धोनीला जवळपास पोहचलाच होता पण जितेशने स्टंम्प आऊट केले.
चेन्नई सुपरकिंग्स संघाचे सामने देशात कोणत्याही स्टेडियमवर असले तरी पिवळा रंगांचा समुह आपल्याला जिकडे तिकडे मैदानात पाहायला मिळतो.
चेन्नईचे चाहते चेन्नई संघाला पाठिंबा देण्यासाठी विशेष म्हणजे धोनीसाठी मोठ्या संख्येने मैदानावर येतात. धोनीची फलंदाजी बघण्यासाठी प्रत्येक जण उत्सुक असतो.
धोनीची फिनिशिरची भूमिका आजही लोकांच्या मनात कायम आहे.
यंदाच्या हंगामातही आपण पाहिले आहे की धोनी अंतिमच्या काही षटकांत फलंदाजीस उतरतो व आक्रमक फलंदाजी करत चाहत्यांना खुश करुन जातो.
परंतु पंजाबविरुद्ध झालेल्या सामन्यात धोनी यंदाच्या आयपीएल हंगामात पहिल्यांदा बाद झाला त्यामुळे त्याच्या रन-आऊटची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे.