टाकळी बु येथे पोळा उत्साहात साजरा
अकोट– तालुक्यातील टाकळी बु येथे पारंपरिक उत्साहात पोळा साजरा करण्यात आला.
शेतकऱ्यांनी आपल्या बैलजोड्या सजवून हनुमान मंदिरात दर्शनासाठी आणल्या. गावातील मुख्य रस्त्यांवर तोरणांनी सजावट करण्यात आली होती.
यावेळी सरपंच निळकंठ वसू यांनी मानाच्या बैलजोडीची पूजा केली. तसेच गावातील शेतकरी सुगदेवरा वसु यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
या सोहळ्यात सागर वसू यांची बैलजोडी विशेष आकर्षण ठरली.
गावकरी, शेतकरी आणि तरुणांच्या सहभागामुळे पोळ्याचा उत्साह अधिकच वाढला होता.
Read also : https://ajinkyabharat.com/san-ejavachaya-parshvabhoomivar-akola-poolisanchi-moheem-200-skepticism/