‘तारक मेहता…’ फेम गुरुचरण सिंहने स्वतःचं रचला बेपत्ता होण्याचा बनाव?

मुंबई– ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या टीव्ही मालिकेत रोशन सोढीची भूमिका साकारणारा अभिनेता गुरचरण सिंग बेपत्ता होऊन जवळपास १० दिवस झाले आहेत. याप्रकरणी त्याच्या वडिलांनीही अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी त्याचा शोध घेण्यासाठी अनेक पथके तयार केली असून या प्रकरणाच्या तळापर्यंत जाण्याचा प्रयत्न सुरू आहे.

या संपूर्ण प्रकारात पोलिसांच्या हाती असे काही पुरावे लागले आहेत ज्यावरून गुरुचरण याने स्वतः बेपत्ता होण्याची योजना आखली असावी असा अंदाज लावला जात आहे. असं पोलिसांच्या हाती नेमकं काय लागलंय?

न्यूज १८ शोशाच्या रिपोर्ट्समध्ये याविषयी माहिती देताना, दिल्ली पोलिसांनी सांगितलं की गुरुचरणने पालम परिसरात आपला फोन सोडला आहे. गुरचरण सिंगचा शोध घेणं कठीण झालं आहे, कारण त्याचा फोन अभिनेत्याकडे नाहीये, असे पोलिसांनी म्हटले आहे.

Related News

पोलीस पुढे म्हणाले, ‘तो ज्या रस्त्याने गेला त्याचं एक सीसीटीव्ही फुटेज आता हाती लागलं आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये आम्हाला कळलं की तो एका ई-रिक्षातून दुसऱ्या ई-रिक्षात जाताना दिसत होता आणि असं दिसतं की तो आधीच सगळं ठरवून आला होता. त्याला मुंबईला जायचंच नव्हतं आणि तो रिक्षात बसून दिल्लीच्या बाहेर गेला आहे. आता तो स्वतः रिक्षात बसून गेला असं दिसत असताना त्याचं अपहरण झालंय असं आपण नक्की सांगू शकत नाही.

अभिनेता शेवटचा २२ एप्रिल रोजी दिसला होता. त्याच्या वडिलांनी चार दिवसांनंतर बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली की, गुरुचरण सिंग, वय ५०, हे २२ एप्रिल रोजी सकाळी ८. ३० वाजता मुंबईला निघाला होता. विमान पकडण्यासाठी तो विमानतळावर गेला होता पण तो ना मुंबईला पोहोचला ना घरी परतला आणि त्याचा फोनही उपलब्ध नाहीये. तो मानसिकदृष्ट्या स्थिर असून कुटुंबीय त्याचा शोध घेत होते, तो सध्या बेपत्ता असल्याची माहिती या तक्रारीत देण्यात आली आहे.

Related News