स्वारगेटनंतर पुण्यात आणखी एक धक्कादायक घटना, चुलत भावासोबत असताना 19 वर्षीय तरुणीवर…

स्वारगेटनंतर पुण्यात आणखी एक धक्कादायक घटना, चुलत भावासोबत असताना 19 वर्षीय तरुणीवर…

Pune Rape Case: चुलत भावासोबत निर्जन स्थळी बसलेल्या 19 वर्षीय तरुणीसोबत घडली

धक्कादायक घटना, दोघे दुचाकीवर आले आणि…, महिलांवर सतत होणाऱ्या अत्याचारामुळे पुणे शहर हदरलं

पुण्यातून आणखी एका धक्कादायक बातमी समोर येत आहे. स्वारगेट बस स्टँड बलात्कार प्रकरण ताजं असताना

Related News

पुण्यात 19 वर्षीय तुरुणीवर बलात्कार झाल्याची घटना समोर येत आहे. पुण्यात स्त्रींयावर सतत होत

असलेले अत्याचार पाहता परिसरात खळबळ माजली आहे. पुणे येथील शिरूर तालुक्यात शनिवारी

रात्री दोन तरुणांनी एका 19 वर्षीय तरुणीवर चाकूचा धाक दाखवून बलात्कार केला.

आणि संपूर्ण घटनेचा व्हिडिओ देखील बनवला. सध्या संबंधित घटनेची पोलीस कसून चौकशी करत आहेत.
पण सतत होत असलेल्या अशा घटनांमुळे महिलांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचं चित्र समोर येत आहे.

कधी आणि कशी घडली घटना?

रांजणगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला तिच्या चुलत

भावासोबत घराजवळील निर्जन ठिकाणी बसली होती. तेव्हा दोन अज्ञात पुरुष दुचाकीहून त्या ठिकाणी पोहचले.

दोघांनी तरुणीला चाकूचा धाक दाखवत तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केले. एवंढच नाही तर,

व्हिडीओ देखील तयार केले. शिवाय तरुणीकडे असलेली सोन्याची नथ आणि पेंडेंट घेऊन आरोपी फरार झाले.

आरोपींना अटक

घडलेल्या घटनेची माहिती मिळाल्यानंतर, वेळ न घालवता पोलिसांनी आरोपीची माहिती गोळा केली

आणि वेगाने शोध सुरू केला. अवघ्या दोन तासांत दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली.

लुटलेले सोन्याचे दागिनेही पोलिसांनी जप्त केल्याची देखील माहिती समोर आली.

याप्रकरणी आता पुढील प्रक्रिया सुरू आहे.

स्वारगेट बस स्टँड बलात्कार प्रकरण

स्वारगेट बस स्टँड बलात्कार प्रकरणी पीडित तरुणीचा न्यायालयात जबाब नोंदवला आहे.

इन कॅमेरा झालेला हा जबाब लिफाफा बंद पाकिटात न्यायालयात सादर करण्यात आला आहे.

तिच्या बाबतीत नेमका काय प्रकार झाला हे जबाबात सविस्तरपणे मांडण्यात आलंय.

या प्रकरणात आरोपी दत्तात्रेय गाडे याचा नुकताच पोलिसांनी जबाब नोंदविला,

तसेच त्याची ससून रुग्णालयात लैंगिक क्षमता चाचणी करण्यात आली आहे.

स्थानकाच्या आवारात असलेल्या शिवशाही बसमध्ये प्रवासी तरुणीवर अत्याचार करण्यात

आल्याची घटना 25 फेब्रुवारीला घडली. तरुणीवर अत्याचार करून पसार झालेल्या गाडे याला

शिरूर तालुक्यातील गुणाट गावातून पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्री अटक केली,

गाडेला न्यायालयाने 12 मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

पोलिस कोठडीत असलेल्या गाडेचा जबाब शनिवारी पोलिसांकडून नोंदविण्यात आला होता.

Read more news here : https://ajinkyabharat.com/dhananjay-munde-rajinamyanantar-suresh-dhasanchi-response-devachi-kathi-cost-no-justice-mito/

Related News