India vs Australia Semi Final Champions Trophy Live Score in Marathi : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील उपांत्य फेरीत टीम इंडिया
विरुद्ध ऑस्ट्रेलिया आमनेसामने आहेत.
दोघांपैकी अंतिम फेरीत कोण पोहचणार? याकडे साऱ्यांचं लक्ष लागून आहे.
Related News
IND vs AUS SF Live Updates : टीम इंडिया दुबईत एकदिवसीय क्रिकेटमध्ये अजिंक्य
टीम इंडियाने आतापर्यंत दुबईत एकही एकदिवसीय सामना गमावलेला नाही.
टीम इंडियाने दुबईत याआधी 9 सामने खेळले आहेत. त्यापैकी 8 सामन्यात विजय मिळवला आहे.
तर 1 मॅच टाय झालीय.
IND vs AUS SF Live Updates : दुबईत टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया आमनेसामने
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील पहिल्या उपांत्य सामन्यात टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया आमनेसामने आहेत.
या सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे.
सामन्याचं आयोजन हे दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे.
- आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील पहिल्या सेमी फायनलमध्ये टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया आमनेसामने आहेत.हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे.टीम इंडियाने साखळी फेरीतील तिन्ही सामने जिंकले आहेत. तर ऑस्ट्रेलियाने 1 सामना जिंकला.तर 2 सामने पावसामुळे रद्द झाल्याने 1-1 असे एकूण 2 गुण मिळाले आणि कांगारु उपांत्य फेरीत पोहचले.आता भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात अंतिम फेरीत पोहचण्यासाठी चांगली चुरस पाहायला मिळणार आहे.या सामन्यातील प्रत्येक अपडेट्स आपण या लाईव्ह ब्लॉगद्वारे जाणून घेणार आहोत.
