Sunita Williams : 9 महिन्यांपासून अंतराळात अडकलेल्या सुनीता विल्यम्सचा पगार किती ?

Sunita Williams : 9 महिन्यांपासून अंतराळात अडकलेल्या सुनीता विल्यम्सचा पगार किती ?

Sunita Williams Salary: गेल्या 9 महिन्यांपेक्षा अधिक काळापासून अंतराळात अडकलेली सुनिता विल्यम्स आणि तिचे

सहकारी बुच विल्मोर लवकरच पृथ्वीवर परतणार आहेत. सुनीता विलियम्स या 5 जून 2024 रोजी नासाच्या मिशनवर गेल्या होत्या.

त्यांची सॅलरी आणि एकूण नेटवर्थ किती, जाणून घेऊया.

Related News

आज येईल, उद्या येईल… असा विचार करत सगळेजण हे अंतराळात अडकलेल्या सुनिता विल्यम्स आणि बुच विल्मोर

यांची वाट बघत आहेत. जून 2024 पासून सुनिता विल्यम्स त्यांच्या सहकाऱ्यासह नासाच्या मिशनवर गेले होते.

मात्र पृथ्वीर परत येण्याची त्यांची मोहिम काही ना काही कारणामुळे विलंबाने होत

असून आता त्यांना अंतराळात जाऊन तब्बल 9 महिने होत आले आहेत. पण आता त्यांच्याा

पुनरागमनाबद्दल एक चांगली बातमी आहे. सुनिता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे दोघे लवकरच

पृथ्वीवर परतणार आगेत. लेटेस्ट रिपोर्टनुसार, ते दोघे मार्चच्या मध्यात पृथ्वीवर परत येतील.

नासाची भारतीय वंशाची अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि तिचा साथीदार बुच विल्मोर हे नऊ

महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) अडकून पडले आहेत. सुनीता विल्यम्स आणि बुच

विल्मोर 5 जून 2024 रोजी इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर ( ISS वर) पोहोचले.

त्याचा प्रवास बोईंग स्टारलाइनर कॅप्सूल मार्गे झाला, परंतु तांत्रिक दोषांमुळे हे यान ISS वरून पृथ्वीवर परत येऊ शकले नाही.

दोन्ही अंतराळवीरांना सुरक्षितपणे परत आणण्यासाठी स्पेसएक्स क्रू ड्रॅगन कॅप्सूलचा वापर केला जाईल,

असे नासाने सांगितले होते. आत्तापर्यंतच्या सर्व वैद्यकीय चाचण्यांमध्ये ते तंदुरुस्त आढळले असून लवकरच त्यांचे पृथ्वीवर

सुरक्षित परत येणे सुनिश्चित केले जाईल. सुनीता विल्यम्स याआधीही अंतराळात गेल्या आहेत

आणि यशस्वीपणे पृथ्वीवर परतल्या आहेत. सुनिता यांना नासातर्फे किती पगार मिळतो आणि त्यांचे नेटवर्थ किती हे जाणून घेऊया.

नासामध्ये किती सॅलरी ?

सुनीता विल्यम्स या माजी नौदल अधिकारी आणि अनुभवी अंतराळवीर आहेत. त्यांनी आपल्या कारकिर्दीत

अनेक महत्त्वाच्या अंतराळ मोहिमांमध्ये भाग घेतला आहे. नासातील अंतराळवीरांना भरघोस पगार दिला जातो.

सुनीता विल्यम्स सारख्या ज्येष्ठ अंतराळवीरांचे वार्षिक वेतन अंदाजे $152,258 (सुमारे 1.26 कोटी रुपये) आहे.

नेटवर्थ किती ?

नासा सुनीता विल्यम्स यांना आरोग्य विमा, मिशनसाठी विशेष प्रशिक्षण, मानसिक आणि कौटुंबिक आधार,

प्रवास भत्ता यासह अनेक सुविधा पुरवल्या जातात. रिपोर्टनुसार, सुनीता विल्यम्सची एकूण

संपत्ती 5 दशलक्ष डॉलर्स (अंदाजे 41.5 कोटी रुपये) इतकी आहे.

शिक्षण कुठे झालं ?

सुनीता विल्यम्स यांनी 1983 मध्ये नीडहॅम हायस्कूलमधून पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी

1987 मध्ये युनायटेड स्टेट्स नेव्हल अकादमीमधून भौतिकशास्त्रात विज्ञान शाखेची पदवी प्राप्त केली.

1995 मध्ये, त्यांनी फ्लोरिडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून मास्टर ऑफ सायन्स पदवी प्राप्त केली,

तिथे अभियांत्रिकी व्यवस्थापन हा त्यांचा मुख्य विषय होता.

Read more news here : https://ajinkyabharat.com/tuhin-kant-pandey-will-be-sebis-new-chairman-madhabi-puri-buchs-place-how-much-will-be-the-salary/

Related News