‘सुप्रियाच्या विरोधात सुनेत्राला उभं करायला नको होतं’, अजितदादा भावुक

उपमुख्यमंत्री अजित पवार सभेत बोलताना चांगलेच भावुक

झाल्याचं पाहायला मिळालं. ‘मी सुप्रियाच्या विरोधात सुनेत्राला

उभं करायला नको होतो, जो काम करतो तो चुकतो, मी मनाचा

Related News

मोठेपणा दाखवला चूक कबूल केली. मला माहिती आहे, इथे

बसणाऱ्या किती तरी जणांनी सुप्रिया यांना मतदान केलं असं

अजित पवार यांनी म्हलटं आहे. अजित पवार सभेत बोलताना

चांगलेच भावुक झाले. मी सुप्रियाच्या विरोधात सुनेत्राला उभं

करायला नको होतं. जो काम करतो तो चुकतो, मी मनाचा

मोठेपणा दाखवला, चूक कबूल केली. मला माहिती आहे इथे

बसणाऱ्यांनी किती तरी जणांनी सुप्रिया सुळे यांना मतदान दिलं.

मी निवडणूक लढणारच नव्हतो पण मी कार्यकर्त्यांचं ऐकलं.

पक्षाने नंतर निर्णय घेतला, महायुतीने जागा राष्ट्रवादीला सोडली.

आजपासून आपली जबाबदारी वाढली आहे.मला महाराष्ट्रात

फिरायचं आहे. कुणीही बाहेर जाऊ नका. आपलं घर व्यवस्थित

बघा. माझचं घर व्यवस्थित नाही, मी तुम्हाला सांगतो असंही

यावेळी अजित पवार यांनी हसत-हसत म्हटलं.

पुढे बोलताना ते म्हणाले की, सगळे मिळून महायुतीची ताकद

वाढवण्याचं काम करू, माझ्या आयुष्यातला हा महत्त्वाचा दिवस

आहे. आजपासून दिवाळीला सुरु होत आहे. विधानसभेसाठी

आठव्यांदा अर्ज भरतोय. लोकसभेला मी एकदा अर्ज भरला.

आपण ऐवढं काम करुन दाखवायचं की लोकांना वाटलं पाहिजे

खरं काम करुन दाखवलं. मी माझी विचारधारा सोडली नाही, शिव,

शाहू आंबेडकरांच्या विचारधारेनं पुढे चाललो आहे. निवडून

गेल्यानंतर ५ वर्ष वाया घालवायची नाहीत. माझ्य़ासोबत अनेक

कार्यकर्ते आले आहेत, असं अजित पवार यांनी यावेली म्हटलं.

Read also: https://ajinkyabharat.com/ab-form-for-both-the-candidates-of-grand-alliance-for-the-same-constituency/

Related News