सुदैवाने जीवितहानी टळली….

सुदैवाने जीवितहानी टळली

अकोला, ता. १७ एप्रिल — अकोला जिल्ह्यातील उरळ पोलीस स्टेशनच्या जवळच काल सायंकाळी

एक ट्रक अचानक पेट घेतल्याची घटना घडली.

संबंधित ट्रक एका खाजगी पाणी बॉटल उत्पादन करणाऱ्या कंपनीचा असल्याची माहिती आहे.

Related News

शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

घटनेच्या वेळी ट्रक रस्त्यावरून जात असताना अचानक धूर निघू लागल्याचे लक्षात

येताच ट्रक चालकाने प्रसंगावधान राखत गाडी थांबवली आणि तात्काळ वाहनाबाहेर पडून

आपला जीव वाचवला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले.

मात्र, तोपर्यंत संपूर्ण ट्रक आगीच्या भक्ष्यस्थानी पडून जळून खाक झाला होता.

या आगीत ट्रकमधील मालासह लाखोंचं नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून आग लागण्याचं नेमकं

कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू केला आहे.

Read Also :   https://ajinkyabharat.com/murtijapurapur-chorratyancha-dhumaku-citizen-ghhetli-gast-moheem-hati/

Related News