मुर्तिजापूरचे नाव जागतिक स्तरावर! उपविभागीय अधिकारी संदीप कुमार आपार यांचा आंतरराष्ट्रीय परिषदेत यशस्वी सहभाग

संदीप कुमार आपार

मुर्तिजापूरचे स्थानिक उपविभागीय अधिकारी (SDO)  संदीप कुमार आपार यांनी भारत निवडणूक आयोगाच्या (ECI) माध्यमातून आंतरराष्ट्रीय निवडणूक परिषदेत सहभागी होऊन शहराचे नाव जागतिक स्तरावर अधोरेखित केले आहे.

लोकशाहीच्या सक्षमीकरण आणि निवडणूक प्रक्रियेतील सुधारणा या विषयावर आयोजित या परिषदेत त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व करत आपला सहभाग यशस्वीरीत्या पूर्ण केला. परिषदेत जागतिक स्तरावरील निवडणूक तज्ज्ञ आणि विविध देशांच्या प्रतिनिधींशी संवाद साधत, नवीन तंत्रज्ञान, मतदारांचा सहभाग वाढवण्याचे उपाय आणि लोकशाही समोरील आव्हाने यावर सविस्तर मंथन झाले.

आपार यांचे हे आंतरराष्ट्रीय अनुभव स्थानिक प्रशासनासाठी नवे मार्गदर्शन ठरणार आहेत. निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर यासह प्रशासकीय कार्याला अधिक गतिमान करण्यास ही झेप उपयोगी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Related News

जिल्हा प्रशासन, राजकीय क्षेत्रातील मान्यवर आणि मुर्तिजापूरच्या नागरिकांकडून आपार यांचे मनःपूर्वक अभिनंदन होत आहे. एका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतलेली ही झेप युवा अधिकाऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

read also :  https://ajinkyabharat.com/alegaon-gram-panchayats-sandwater-crisis-intense-anger-of-citizens-and-5-important-steps-of-the-movement/

Related News