भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आपला 74 वा वाढदिवस साजरा
करत आहेत. मोदींच्या शुभचिंतकांकडून आज त्यांच्यावर शुभेच्छांचा
वर्षाव होत आहे. मोदींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ‘सेवा पखवाडा’
Related News
चेहऱ्याचा रंग उजळण्यासाठी सोपे घरगुती उपाय….
कांगो नदीत भीषण बोट दुर्घटना;
फ्लोरिडा विमानतळावर थरारक क्षण;
झारखंडच्या रांचीमध्ये पहिल्यांदाच एअर शो;
दिल्लीतील मुस्तफाबादमध्ये इमारत कोसळली;
पुन्हा ‘ठाकरे विराजमान’? राज ठाकरे यांचा युती प्रस्ताव, उद्धव ठाकरे यांचा सकारात्मक प्रतिसाद!
तापमान वाढीमुळे पोल्ट्री व्यवसायाला फटका;
माकडांच्या टोळक्यांमध्ये भीषण झटापट; रस्त्यावरच दिसला ‘गँगवॉर’सारखा थरार
पत्नीच्या मारहाणीची तक्रार करताच नवऱ्यावरच 307 कलमांतर्गत गुन्हा
पत्नीने आइब्रो सेट केल्याच्या रागातून पतीने केली चोटी कापण्याची धक्कादायक घटना
हरिद्वार-देहरादून महामार्गावर महिलेचा गोंधळ,…
अकोल्यात गुडफ्रायडे भक्तीभावाने साजरा
साजरा केला जात आहे. दरम्यान आज नरेंद्र मोदी ओडिशाच्या दौर्यावर
आहेत. तेथे महिलांना आज ‘सुभद्रा योजना’ अर्पण करणार आहेत.
74 व्या वाढदिवसा दिवशी मोदी ओडिशामध्ये ‘सुभद्रा योजना’ सह 26 लाख
जणांना पीएम आवास योजना अंतर्गत घरं देणार आहेत. भुवनेश्वरच्या Gadakana
मध्ये आज ते लोकांना घरं देणार आहेत. दरम्यान पोलिस कमिशनर संजीव
पांडा यांच्या माहितीनुसार, पीएम मोदी भुवनेश्वर एअरपोर्ट वरून ते Gadakana
च्या झोपडपट्टीला भेट देणार आहेत. नरेंद्र मोदी यावेळी लाभार्थ्यांशी भेट
घेण्याची शक्यता आहे. त्यानंतर ते जनता मैदान मध्ये सुभद्रा योजना लॉन्च
करणार आहेत. तसेच काही इंफ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टसची देखील सुरूवात होणार आहे.
सुभद्रा योजना
आज नरेंद्र मोदी ओडिशामध्ये महिलांना सुभद्रा योजनेचं गिफ्ट देणार आहेत.
सुभद्रा ही हिंदू पुराणकथांनुसार, जगन्नाथ यांची बहीण होती. तिच्या नावे ही
योजना सुरू होत आहे. दरम्यान या योजनेअंतर्गत गरीब महिलांना दहा हजार
रूपयांचं अर्थसहाय्य मिळणार आहे. 1 कोटी महिला यामध्ये लाभार्थी आहेत.
पाच वर्षांसाठी दोन टप्प्यांत ही रक्कम त्यांना मिळणार आहे.
नरेंद्र मोदी 2001 ते 2014 पर्यंत सलग तीन वेळा गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम
केले. त्यांनी गुजरातचा कायापालट केला. 2014 मध्ये जेव्हा ते भारताचे पंतप्रधान
झाले तेव्हा त्यांच्या नेतृत्वाचा मार्ग राष्ट्रीय स्तरावर चालू झाला आणि सध्या ते तिसऱ्यांदा
देशाच्या पंतप्रधान पदावर आहेत. आज त्यांच्या जन्म दिवशीच एनडीए सरकारचे
100 दिवसही पूर्ण होत आहेत.
Read also: https://ajinkyabharat.com/ajit-pawar-gatchaya-netayachaya-vidhanane-political-circles-turmoil/