अकोल्यात परीक्षा घोळाने खळबळ! Intercultural ऐवजी International Communication पेपर आल्याने विद्यार्थी संतापले

परीक्षा घोळा

संस्कृती सोनटक्के : अजिंक्य भारत 

सीताबाई कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अकोला येथील परीक्षा केंद्रावर आज  दुपारी 2 वा. MA Journalism & Mass Communication च्या “Intercultural Communication” विषयाचा पेपर होणार होता. मात्र झालेल्या गंभीर गोंधळामुळे संपूर्ण परीक्षा प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

 नेमकं काय घडलं?

परीक्षेवेळी विद्यार्थ्यांना अपेक्षित “Intercultural Communication” ऐवजी थेट “International Communication” या विषयाची प्रश्नपत्रिका देण्यात आली. या प्रकारामुळे परीक्षागृहात काही काळ गोंधळ, संभ्रम आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले.विद्यार्थ्यांनी तात्काळ परीक्षा केंद्र प्रशासनाकडे आक्षेप नोंदवत हा प्रकार लक्षात आणून दिला.

 प्रशासनाचा दावा

परीक्षा केंद्र प्रशासनाने सांगितले की प्रश्नपत्रिका विद्यापीठाकडून सीलबंद स्वरूपात प्राप्त झाली होती. त्यामुळे हा गोंधळ विद्यापीठ स्तरावर झालेल्या पेपर कोडिंग किंवा वितरण प्रक्रियेत झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 विद्यार्थ्यांचा संताप

या प्रकारामुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. मेहनत करून अभ्यास केलेल्या विषयाऐवजी पूर्णपणे वेगळा पेपर आल्याने अनेक विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. काही विद्यार्थ्यांनी या प्रकाराला “परीक्षा व्यवस्थेतील गंभीर हलगर्जीपणा” असे संबोधले.विद्यार्थ्यांनी या प्रकाराला “गंभीर शैक्षणिक चूक” असे संबोधत विद्यापीठाकडून तात्काळ न्याय आणि पुनर्परीक्षेची मागणी केली आहे.

 पुढे काय?

या प्रकरणाची विद्यापीठ स्तरावर सखोल चौकशी होण्याची शक्यता आहे. तसेच संबंधित पेपर पुन्हा घेण्यात येणार का किंवा पर्यायी निर्णय घेतला जाणार का, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

“आम्ही रात्रंदिवस अभ्यास ‘Intercultural Communication’ साठी केला होता. पण पेपर बघूनच डोकं फिरलं, पूर्णपणे वेगळाच पेपर आला.”“हा सरळ आमच्यावर अन्याय आहे. तयारी वेगळी आणि प्रश्नपत्रिका वेगळी – त्यामुळे आमचा संपूर्ण पेपर बिघडला .“परीक्षा केंद्रावर काही मिनिटांतच गोंधळ झाला. आमचा विश्वासच उडाला. एवढा मोठा निष्काळजीपणा कसा काय होतो?”“आम्ही खूप ताणात आहोत ,  हा पेपर पुन्हा घ्यायलाच हवा.”

-मृण्मयी शेगावकर (  विद्यार्थीनी ) 

read also :  https://ajinkyabharat.com/super-overcha-motha-blunder-due-to-3-reasons-pancha-decision-became-fatal/