विद्यार्थ्यांना शिकवले आपत्ती व्यवस्थापनाचे धडे

शिस्त,धैर्य आणि जनजागृतीचा संगम

यावर्डीत आपत्ती व्यवस्थापन जनजागृती अभियान यशस्वीरित्या संपन्न

TDRF सदस्य नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद

कारंजा(लाड) : श्री बाबासाहेब धाबेकर माध्यमिक विद्यालय, यावर्डी (ता. कारंजा, जि. वाशिम) येथे १७ सप्टेंबर रोजी आपत्ती व्यवस्थापन जनजागृती अभियान व TDRF सदस्य नोंदणी अभियान उत्साहात राबविण्यात आले. या अभियानाचे मार्गदर्शन TDRF संचालक हरिश्चंद्र राठोड यांच्या सूचनेनुसार TDRF मुख्य क्षेत्रीय अधिकारी कु. मुस्कान जलील सय्यद यांनी केले.या अभियानात विद्यार्थ्यांना नैसर्गिक तसेच मानवनिर्मित आपत्तींची उदाहरणे देऊन माहिती देण्यात आली. आपत्तीच्या प्रसंगी स्वतःचा व इतर नागरिकांचा जीव धैर्याने कसा वाचवायचा, शिस्तबद्धतेचे महत्त्व आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या विविध तंत्रांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.अभियानादरम्यान अनेक विद्यार्थ्यांनी TDRF सदस्यत्व स्वीकारण्याची इच्छा व्यक्त केली.शाळेचे मुख्याध्यापक विजय देविदास भड अध्यक्षस्थानी होते. त्यांनी कु. मुस्कान यांनी सोप्या व साध्या भाषेत विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाची महत्त्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल अभिनंदन करून आभार मानले.या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून वेदांत थाटे, शिक्षिका शालिनी ओलीवकर, तसेच अनिल हजारे उपस्थित होते. आभार प्रदर्शन शिक्षक गोपाल काकड यांनी केले.विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी झाला.

read also :  https://ajinkyabharat.com/ranjit-patil-kale-yanchaya-vadddivasimit-mofat-mofat-handan-shibir/