अकोल्यात जिल्हा प्राथमिक शाळेचा अजब कारभार, शाळेतील बाकांवर विषारी अळ्या! 

वर्गखोल्या

वर्गखोल्या नसल्याने खुल्या मैदानात भरते शाळा, बाकांवर विषारी अळ्या! 

विद्यार्थ्यांनी शिकायच कस?

अकोल्यात जिल्हा प्राथमिक शाळेचा भोंगळ कारभार समोर आला आहे.

Related News

अकोल्यातील दिग्रस बुद्रुक गावातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत

वर्गखोल्या नसल्याने खुल्या मैदानात शाळा भरत आहे.

मात्र, इथं विद्यार्थ्यांसोबत काही वेगळच घडत असल्याचे चित्र आहे.

झाडाखाली भरत असलेल्या विद्यार्थ्यांच्या बाकांवर

विषारी अळ्या पडत असून त्याचा विद्यार्थ्यांना त्रास होत आहे.

जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये अपेक्षित वर्ग खोल्या नसल्याने

येथील शिक्षक काही वर्ग खुल्या मैदानात भरवत असतात.

झाडाखाली असलेल्या शालेय विद्यार्थ्यांच्या बेंचवर

झाडावरील विषारी अळ्या पडत असल्याने विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका असल्याच पालकांच म्हणणं आहे.

दरम्यान, या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी वर्गखोल्या बांधण्यात याव्या

अन्यथा रास्ता रोको आंदोलन करू व शाळेला कुलूप ठोकू,

असा इशारा विद्यार्थ्यांच्या पालकांनी दिलाय.

शाळेच्या परिसरात असलेल्या झाडावर

मोठ्या प्रमाणांत विषारी अळ्यांचा प्रादूर्भाव दिसून येत आहे.

त्यामुळे पालक मुलांना शाळेतून बाहेर काढण्याचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत.

Read also: https://ajinkyabharat.com/chandrapurat-mns-official-shot/

Related News