राज्य राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त संघाची वाशिम जिल्हा कार्यकारिणी जाहीर

राज्य राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त संघाची वाशिम जिल्हा कार्यकारिणी जाहीर

कारंजा लाड=दि.८

महाराष्ट्रातील राज्य राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या समस्या सोडवणारी एकमेव संघटना म्हणजे

राज्य राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक संघ. या संघटनेच्या वाशिम जिल्हा शाखेच्या नव्या कार्यकारिणीची निवड नुकतीच झाली.

या निवड सभेला राज्याध्यक्ष सुभाष जिरवणकर आणि अमरावती विभागीय अध्यक्ष गजानन गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी शिक्षकांच्या विविध मुद्द्यांवर सखोल चर्चा झाली. विशेषतः पुरस्कार प्राप्त शिक्षकांना

पूर्वीप्रमाणे दोन वेतनवाढी मिळाव्यात यासाठी न्यायालयात जाण्याचा विचार करण्यात आला.

सभेच्या शेवटी वाशिम जिल्ह्याकरिता एकमताने नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

या कार्यकारिणीत जिल्हाध्यक्ष अजयकुमार मोटघरे, जिल्हा सरचिटणीस अर्जुन वरघट,

जिल्हा सल्लागार दीपक राऊत, जिल्हा कार्याध्यक्ष आनंद सुतार, जिल्हा कोषाध्यक्ष संभाजी,

जिल्हा उपाध्यक्ष विलास गांजरे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख मोहन शिरसाट, जिल्हा मुख्य संघटक पंढरीनाथ चोपडे,

जिल्हा संपर्कप्रमुख मुरलीधर जाधव, जिल्हा महिला प्रतिनिधी श्रीमती मीनाक्षी नगराळे, राज्य प्रतिनिधी राजू मोरे,

तसेच अमरावती विभागाचे प्रतिनिधी भारत लादे व गोवर्धन मुंदडा यांचा समावेश आहे.

नवीन कार्यकारिणीची घोषणा होताच सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले.

आगामी काळात संघटनेच्या माध्यमातून शिक्षकांच्या हक्क व प्रश्नांवर ठाम भूमिका घेण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

Read Also : https://ajinkyabharat.com/vitholichya-shala-durusthi-tanda-reform-committee-efforts/