बोर्डी शाळेचे मुख्याध्यापक उमेश चोरे यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक ‘पुरस्कार-२०२४

बोर्डी शाळेचे मुख्याध्यापक उमेश चोरे यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक 'पुरस्कार-२०२४

 

अकोट यशवंतराव चव्हाण सेंटर शिक्षण विकास मंचच्या वतीने डाॅ.कुमुद बन्सल गुणवंत शिक्षक

राज्य पुरस्कार मागील वर्षापासून सुरु करण्यात आला आहे.एक पुरूष आणि एक महिला शिक्षक यांना हा

Related News

राज्यस्तरीय प्रतिष्ठीत शिक्षक पुरस्कार दिला जातो.सन २०२४ चा डाॅ.कुमुद बन्सल गुणवंत शिक्षक पुरस्कार

अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या जि.प.आदर्श मराठी शाळा बोर्डी येथील

मुख्याध्यापक उमेश पांडुरंग चोरे यांना देण्यात आला आहे.मुख्याध्यापक उमेश चोरे हे जि.प.वरिष्ठ प्राथमिक सेमी इंग्रजी

आदर्श पी.एम.श्री.शाळा बोर्डी पं.स. अकोट येथे कार्यरत आहेत.दि.५ जानेवारी रोजी यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथे

संपन्न झालेल्या पंधराव्या राज्यस्तरीय शिक्षण परिषदेत मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

रोख पुरस्कार व सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.मुख्याध्यापक उमेश चोरे हे प्रभारी मुख्याध्यापक तथा प्रभारी केंद्रप्रमुख म्हणून कार्य करत आहेत.

त्यांनी आदिवासीबहुल भागात कार्य करून बोर्डी शाळेचा कायापालट केला पूर्ण महाराष्ट्रात बोर्डी शाळेचे नाव उंचावले आहे.

त्यांनी पूर्वीची शाळा वडाळी सटवाई तथा बोर्डी परिसरातून दहा लाखापेक्षा अधिक वर्गणी करून तालुक्यातील

पहिली शंभर टक्के डिजिटल शाळा तयार केली आहे.या शाळेला त्यांची मोलाची मेहनत आहे.

इयत्ता पहिली ते आठवी इंग्रजी विषयाचे राज्यस्तरीय प्रशिक्षण व तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून कार्य करतात.

त्यांनी अकोट तालुक्यातील केंद्रांना तीन वर्ष ‘TAG COORDINATOR’म्हणून विशेष कार्य केले आहे.

बाला पेंटिंग ही मुख्याध्यापक उमेश चोरे यांची वैशिष्ट्यपूर्ण बाब आहे.बाला ( BALA ) उपक्रमाची जिल्हास्तरीय

पुस्तिका निर्माण करण्यात संपादकीय भूमिका त्यांनी बजावली आहे.जि.प.शाळा बोर्डीला आंतरराष्ट्रीय शाळा

म्हणून संलग्नता मिळवून देण्यास त्यांचा महत्त्वाचा व अतिशय मोलाचा वाटा आहे.विद्यार्थ्यांना वाचनाची आवड

निर्माण व्हावी याकरीता शाळा स्तरावर पुस्तकांची शाळा हा विशेष नाविण्यपूर्ण उपक्रम सूरू केला आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/inauguration-of-punyaat-metro-phase-3-project-provides-great-relief-to-passengers/

Related News