राजकीय चर्चा थांबवा! राज ठाकरेंचा पदाधिकाऱ्यांना स्पष्ट आदेश

राजकीय चर्चा थांबवा! राज ठाकरेंचा पदाधिकाऱ्यांना स्पष्ट आदेश

“युतीवर भाष्य नको, आधी माझी परवानगी घ्या” – राज ठाकरे

मुंबई : शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे युतीबाबत सुरू असलेल्या चर्चांदरम्यान,

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना युतीवर मौन बाळगण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत.

Related News

कोणत्याही पदाधिकाऱ्याने युतीसंदर्भात वक्तव्य करायचे झाल्यास माझी परवानगी घ्या, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.

मराठी विजय मेळाव्यात उद्धव-राज ठाकरे यांचे एकत्र मंचावर येणे यामुळे युतीच्या चर्चांना जोर आला होता.

मात्र राज ठाकरे यांनी सावध भूमिका घेतल्याने राजकीय समीकरणांवर गूढतेचे सावट आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना सांगितले की,

अंतिम निर्णय होईपर्यंत कोणताही अंदाज व्यक्त करू नये.

त्यामुळे आता युतीबाबतची उत्सुकता अधिक वाढली असून ठाकरे-मनसे युतीचा सस्पेन्स आणखी गडद झाला आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/bihar-madhyal-matdar-yadi-punarvarshanala-supreme-court-awhan-adr-chi-palika/

Related News