मुंबई | प्रतिनिधी
महाराष्ट्रात आजचा दिवस घातक ठरला आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये अपघातांच्या मालिकेत एकूण
आठ जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. लातूर, पुणे, कल्याण,
Related News
“गोळ्या पाकनं झाडल्या, पण स्फोट भारतानं घडवले!”
“..तरच आम्ही हस्तक्षेप करणार!” — वक्फ सुधारणा कायद्यावर सर्वोच्च न्यायालयाची ठाम टिप्पणी
ऑपरेशन सिंदूरनंतर उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्र्यामध्ये थेट चर्चा;
पूजा मेश्राम यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर अकोल्याचा झेंडा फडकावला
निंबा फाटा ते काजीखेळ रस्ता: खड्ड्यांचे साम्राज्य, बांधकाम विभाग झोपेत!
बाळापूर येथे भाजपची भव्य ऐतिहासिक तिरंगा रॅली मोठ्या उत्साहात संपन्न
35 लाख घरांची लॉटरी, नवी मुंबईसाठी दोन नवीन धरणं;
भारताचे 4 कोटींचे आंबे अमेरिकेने का परत पाठवले?
राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न गंभीर :
मनोज जरंगे पाटलांचा भुजबळांच्या शपथविधीवर संताप :
छगन भुजबळ मंत्रिमंडळात पुन्हा एण्ट्री;
कृषी सहायकांचा एकदिवसीय काम बंद आंदोलन;
विक्रोळी आणि जळगाव येथे हे अपघात झाले. कुठे डंपर नदीत कोसळला,
तर कुठे दुचाकींची समोरासमोर धडक झाली. लातूर जिल्ह्यातील
अपघातांमध्ये एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
लातूर: दोन वेगवेगळ्या अपघातांत सहा जण ठार
-
घरणी (चाकूर तालुका) येथे दोन दुचाकींमध्ये समोरासमोर धडक होऊन आई, मुलगा आणि जावई अशा एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू.
-
बार्शी रोडवरील उड्डाणपुलावर ट्रॅक्टर-रिक्षा अपघातात आणखी तिघांचा मृत्यू.
-
गेल्या तीन दिवसांत लातूर जिल्ह्यात नऊ जणांचा मृत्यू.
पुणे: शाळेत घुसला टेम्पो
-
सासवड-जेजुरी पालखी मार्गावर खळद येथे आयशर टेम्पो थेट जिल्हा परिषद शाळेच्या आरसीसी वर्गात घुसला.
-
मोठ्या नुकसानीसह कोणतीही जीवितहानी टळली, चालक जखमी.
नाशिक: सप्तश्रृंगी घाटात दरड कोसळली
-
पुण्याहून आलेल्या भाविकांच्या कारवर दगडगोट्यांचा मारा.
-
सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही, रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.
कल्याण: डंपर नदीत कोसळला
-
गांधारी ब्रिजवर डंपरने रिक्षाला धडक दिल्यानंतर ब्रिजचे कठडे तोडून थेट नदीत कोसळला.
-
महिलेचा मृत्यू, एक जण गंभीर, दोन जण बेपत्ता.
-
रेस्क्यू ऑपरेशन सुरू, अग्निशामक दल घटनास्थळी.
विक्रोळी: दोन वाहने पलटी
-
नारायण बोधे पुलावर टेम्पो आणि टाटा सफारीची धडक.
-
दोन्ही वाहने रस्त्यावर उलटली, दोन्ही चालक किरकोळ जखमी.
-
वाहतुकीची कोंडी, पोलिस व आपत्ती व्यवस्थापन पथकांनी नियंत्रण मिळवलं.
जळगाव: रिक्षा चालकाचा मृत्यू
-
अमळनेर (मंगरूळ MIDC जवळ) चारचाकी वाहनाची रिक्षाला जोरदार धडक.
-
रिक्षाचालक भटू पाटील यांचा मृत्यू, रिक्षा चक्काचूर.
राज्यभरातील या अपघातांच्या घटनांमुळे वाहतूक सुरक्षा आणि रस्त्यांची स्थिती यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
संबंधित विभागांनी यावर तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.