सेंट पॉल्स अकॅडमीचे तायक्वांदोवीर चमकले, विभागीय स्तरावर झेप

सुवर्णपदक विजेते सेंट पॉल्सचे तायक्वांदोवीर

अकोट :जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अकोला यांच्या वतीने वसंत देसाई स्टेडियम, अकोला येथे नुकत्याच पार पडलेल्या

जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत सेंट पॉल्स अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी जोरदार चमक दाखवली. घवघवीत यश संपादन करत एकूण

पाच विद्यार्थ्यांची विभागीय स्तरासाठी निवड झाली आहे.

१४ वर्षाखालील गटात ईश्वरी शिंगणे व आराध्य शेगोकार यांनी सुवर्ण पदकाची कमाई केली. वीर हराळे याने रौप्य पदक तर श्रवण

शेगोकार याने कांस्य पदक मिळवले.तर १७ वर्षाखालील गटात ओम गावंडे, ओम इंगळे व चेतन घुगे यांनी सुवर्ण पदक पटकावत

स्पर्धेत आपले वर्चस्व सिद्ध केले.विद्यार्थ्यांनी आपल्या या यशाचे श्रेय संस्थेचे संस्थाध्यक्ष मा. नवनीतजी लखोटिया, उपाध्यक्ष

लुनकरणजी डागा, सचिव प्रमोद चांडक, मुख्याध्यापक विजयजी बिहाडे, उपमुख्याध्यापिका ममता श्रावगी, तसेच शिक्षकवर्ग व

मार्गदर्शकांना दिले.या यशामागे तायक्वांदो प्रशिक्षक अनुप चांदणे, क्रीडा शिक्षक अभिलाष काळमेघ, प्रणव देंडव, सुयोग

कल्पेकर व नारायण वानखडे यांचे मार्गदर्शन लाभले असल्याचे विद्यार्थ्यांनी नमूद केले.

Read also :https://ajinkyabharat.com/amarwell-controlsathi-unity-administrative-thunder/