आता एसटी प्रशासनातर्फे एसटी पास थेट शाळेत !

शालेय विद्यार्थ्यांना

शालेय विद्यार्थ्यांना घर ते शाळा आणि शाळा ते घर या प्रवासासाठी

एस टी महामंडळ एकमेव साधन आहे.

Related News

गाव खेड्यात पोहचणारी एस टी सकाळी ७ वाजेपर्यंत पासून रात्री ७ वाजेपर्यंत

प्रवासी वाहतूक करीत असते.

कारण देशाचे उज्वल भविष्य घडविणारे विद्याथ्यर्थ्यांना प्रवासाचा त्रास होऊ नये म्हणून

राज्य परिवहन महामंडळाने विद्यार्थ्यांना ३३ टक्के रक्कम भरून

मासिक प्रवासी पास उपलब्ध करून दिल्या आहेत.

त्यानंतर आदिवासी बहुल ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी

शासनाने मानव विकास मिशन अंतर्गत शाळा ते घर आणि परत या प्रवासासाठी

मोफत प्रवास सवलत उपलब्ध करून दिली.

यासाठी मात्र शाळा बुडवीत एस टी आगार आणि कागदपत्रे जमा करताना

विद्यार्थ्यांची दमछाक व्हायची , मात्र आता विद्यार्थ्यांना पायपीट करण्याची गरज नाही

कारण उद्पायासून एस टी महामंडळ कडून थेट शाळेतच विद्यार्थी पासेस

उपलब्ध करून दिल्या जात आहेत.

शाळा महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी विद्यार्थिनींना आता

एसटीची मासिक पास हे थेट त्यांच्या शाळेत वितरित करण्यात येणार आहेत.

तशा सूचना एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी

स्थानिक एसटी प्रशासनाला दिल्या आहेत.

नवीन वर्षाच्या पहिल्या सत्रातील बऱ्याच शाळा आता सुरू झालेल्या आहेत.

तर काही भागात लवकरच सुरू होणार आहे.

घरापासून शाळेपर्यंत जाण्यासाठी शासनाने विद्यार्थ्यांना

एसटीच्या माध्यमातून ६६ टक्के इतकी सवलत दिली आहे,

त्याचप्रमाणे शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत

बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थिनींना मोफत एसटी पासचे वितरण केले जाते.

यासाठी विद्यार्थी विद्यार्थिनींना एसटीच्या पास केंद्रावर जाऊन रांगेत उभा राहूह्न पास घ्यावे लागत होते.

किंवा गटागटाने आगारात जाऊन आगार व्यवस्थापन कडून पास घेतले जात असत.

पण यंदापासून विद्यार्थ्यांना पाससाठी आता रांगेत ताटकळत उभे राहावे लागणार नाही.

त्यांच्या शाळा-महाविद्यालयांनी पुरवलेल्या यादीनुसार एसटीच्या कर्मचाऱ्याकडून

त्या विद्याथ्यर्थ्यांना आणि विद्यार्थिनींना त्यांचे एसटी पास थेट शाळेत देण्यात येणार आहेत.

या संदर्भात उद्या १८ जुन पासुन एसटी प्रशासनातर्फे

‘ एसटी पास थेट तुमच्या शाळेत’ हि विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.

तत्पूर्वी सर्व शाळा महाविद्यालयाच्या मुख्याध्यापक व प्राचार्य यांना

एसटीच्या आगार व्यवस्थापकांनी पत्र देऊन आपल्या शाळेत नवीन वर्षात शिकणाऱ्या

विद्यार्थी विद्यार्थ्यांची यादी तयार ठेवण्यास सांगितले आहे.

या अभिनव योजनेचा लाभ राज्यभरात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी- विद्यार्थिनींना होणार आहे.

शाळांना भेटी देणे प्रक्रिया सुरु झाली

अकोला विभागीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या एकूण ९ आगारात

मानव विकास मिशनंच्या ३५ गाड्या आहेत

तर ज्या रस्त्यांवर आणि आगारांमधून सूस्थितीत असलेल्या बसेस धावत आहेत,

त्या मार्गावरील शाळांना परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी

संबंधित शाळांना भेटी देणे सुरु केल्या आहेत

तर काही शाळांच्या शिक्षकांनी आगार प्रमुखांना

विद्यार्थी पासेस बाबत संपर्क करणे सुरु केले आहे.

या बाबत येत्या १ जुलै पर्यंत सर्व प्रवेश निश्चित होतील

आणि विद्यार्थी संख्याही निश्चित होईल

त्यानंतर शाळांमध्ये जाऊन पासेस वितरण करण्यासंबंधी नियोजन करण्यात येणार आहे.

अशी माहिती अकोला विभागीय नियंत्रक शुभांगी सिरसाट यांनी दै अजिंक्य भारत ला दिली आहे.

Read also: महाराष्ट्रात पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज, पावसाची वाटचाल मंदावली ! (ajinkyabharat.com)

Related News