राज्यभरातील एस. टी. कर्मचारी पुन्हा एकदा संपावर जाणार असल्याची
माहिती पुढे आली आहे. राज्यातील एसटी कर्मचारी संघटनेच्या कृती
समितीची आज बुलढाणा येथे बैठक झाली. या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांना
Related News
अकोल्यात गुडफ्रायडे भक्तीभावाने साजरा
मोखा ग्रामपंचायतीचा बेजबाबदार कारभार :
अवकाळी पावसाचा वणीसह परिसराला तडाखा;
दहीगाव प्रकरणाचा निषेध; तेल्हारा शहर बंद, बाजारपेठा ठप्प
अलीगढमधील हॉटेलमध्ये देवतांच्या चित्रांसह नॅपकिन दिल्याने गोंधळ;
पाच वर्षांनंतर कैलास-मानसरोवर यात्रेला पुन्हा सुरूवात;
चंदननगरमध्ये तरुणाचा निर्घृण खून
पातूर शहरात ‘रान कसायांची’ टोळी सक्रिय
अकोल्यात गुड फ्रायडे भाविकतेने साजरा;
एका महिन्याच्या चिमुरडीची निर्घृणपणे हत्या….
काही सेकंदांची चूक आणि आयुष्य संपलं…
जय श्री राम ग्रुप द्वारा गौसेवा कार्य
राज्य शासकीय कर्मचाऱ्यानुसार वेतन देण्यात यावं, या मागणीसाठी येत्या
3 सप्टेंबरपासून राज्यभरात एसटी कर्मचारी मोठ आंदोलन करणार असल्याचा
इशारा आज देण्यात आला आहे. 3 सप्टेंबरनंतर गणेशोत्सव सुरू होतो .
मात्र या काळातही एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारले तर प्रवाशांचे मोठे
हाल होऊ शकतात. त्यामुळे राज्य सरकारने आमच्या मागण्या लवकर मान्य कराव्या,
असा इशाराही कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
या अंदोलना विषयी बोलताना कृती समितीच्या पदाधिकारी म्हणाले की, महाराष्ट्राची
जीवनवाहिनी लालपरी हा महाराष्ट्राचा अविभाज्य घटक आहे. वाहतुकीच्या बाबतीत
महाराष्ट्र परिवहन मंडळ हे आशिया खंडात एक नंबरला आहे. या स्थितीत
राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे पगारवाढ मिळावी, यासाठी विविध संघटनांच्या
माध्यमातून ही कृती समिती तयार झालीय आणि 2016 पासून आमची मागणी
राज्यकर्त्यांपर्यंत आम्ही वेळोवेळी आंदोलन करून पोहोचवण्याचा प्रयत्न केला.
राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देण्याचा आम्हाला आश्वासन दिले.
परंतु, ती मागणी अद्यापही पूर्ण झालेली नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अतिसंवेदनशील
मुख्यमंत्री म्हणून ओळखले जातात. महाराष्ट्रातील जनतेला न्याय देत असताना त्यांनी
कर्मचाऱ्यांना देखील न्याय द्यावा. वेतन आयोगाच्या धर्तीवर करार करून राज्य शासकीय
कर्मचाऱ्यांप्रमाणे पगार वाढ द्यावी, अन्यथा कृती समितीच्या माध्यमातून 3 सप्टेंबरपासून
एसटी कर्मचारी मोठे आंदोलन छेडतील, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
Read also: https://ajinkyabharat.com/courts-big-decision-regarding-12-mlas-appointed-by-the-governor/