श्रीराम नवमी निमित्त मूर्तीजापुरात — सुप्रसिद्ध गायिका अधिष्टा व अनुष्का भटनागर

श्रीराम नवमी निमित्त मूर्तीजापुरात — सुप्रसिद्ध गायिका अधिष्टा व अनुष्का भटनागर

मूर्तीजापूर (प्रतिनिधी): येथील जुनी वस्तीतील चंद्रशेखर आझाद चौक (मोरारजी चौक) येथे श्रीराम नवमीच्या निमित्ताने

भव्य भजन संध्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

समाजसेवक आतिष महाजन यांच्या पुढाकाराने व श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने रविवार,

Related News

दिनांक ६ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.

या भजन संध्येत मध्यप्रदेशातील मंदसौर येथील सुप्रसिद्ध गायिका अधिष्टा भटनागर व अनुष्का

भटनागर आपल्या सुमधुर आवाजातून भक्तिरसाचा वर्षाव करणार आहेत.

कार्यक्रमात प्रभू श्रीराम, हनुमानजी व खाटू श्याम बाबांच्या मूर्तींचे पूजन करण्यात येणार असून,

विशेष नेत्रदीपक एलईडी लाईट शो, आकर्षक पेपर ब्लास्टर,

भव्य आतिषबाजी तसेच अद्ययावत साऊंड सिस्टीमची सोय करण्यात आली आहे.

या कार्यक्रमात विविध देवतांच्या देखाव्यांचे दर्शन भाविकांना घेता येणार आहे.

गर्दीचा अंदाज लक्षात घेता पुरुष व महिला बाउंसरसह पोलीस प्रशासनामार्फत सुरक्षेची चोख व्यवस्था करण्यात आली आहे.

उपस्थित महिला भगिनींनी मौल्यवान दागिने किंवा वस्तू न घालता उपस्थित राहावे,

असे आवाहन आयोजक आतिष महाजन यांनी पत्रकार परिषदेदरम्यान केले.

कार्यक्रमाचे आयोजन आतिष महाजन व मित्रपरिवार दिनाच्या वतीने करण्यात आले असून,

अधिकाधिक भक्तांनी या भजन संध्येत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related News