श्रीनगर – अमरनाथ यात्रा 2025 साठी नोंदणी प्रक्रियेची सुरुवात झाली आहे…

श्रीनगर – अमरनाथ यात्रा 2025 साठी नोंदणी प्रक्रियेची सुरुवात झाली आहे...

श्रीनगरअमरनाथ यात्रा 2025 साठी आजपासून (15 एप्रिल) नोंदणी प्रक्रियेची सुरुवात झाली आहे.

यावर्षी यात्रेचा कालावधी 3 जुलै ते 9 ऑगस्ट (रक्षाबंधन) असा 39 दिवसांचा असून,

सुमारे 6 लाख भाविकांच्या उपस्थितीची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Related News

भाविक ऑनलाइन व ऑफलाइन दोन्ही माध्यमातून नोंदणी करू शकतात.

नोंदणीसाठी 220 रुपये शुल्क आकारण्यात आले असून, 600 हून अधिक बँकांमध्ये

ऑफलाइन नोंदणीची सुविधा उपलब्ध आहे.

यावेळी यात्रा दोन मार्गांनी – पहलगाम (अनंतनाग)बालटाल (गंदरबल) मार्गांद्वारे होणार आहे.

श्री अमरनाथ श्राइन बोर्डाच्या बैठकीत यात्रेच्या तारखा निश्चित करण्यात आल्या होत्या.

ई-केवायसी, आरएफआयडी कार्ड, ऑन-स्पॉट नोंदणी यासारख्या सुविधांमध्ये

सुधारणा करून यात्रा अधिक सुलभ आणि सुरक्षित करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून प्रत्येक भाविकासाठी आरोग्य तपासणी अनिवार्य करण्यात आली आहे.

काही भक्तांनी आपली उत्सुकता व्यक्त करत दरवर्षी या पवित्र यात्रेत सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/ambedkar-jayanti-procession/

Related News