सोयाबीन पिकावर रोगांचा प्रादुर्भाव; शेतकरी संकटात, 

सोयाबीन

सोयाबीन पिकावर रोगांचा प्रादुर्भाव; शेतकरी संकटात,

 बोरगाव मंजू- यंदाच्या हंगामात सुरुवातीला पावसाळा समाधानकारक असल्याने शेतकऱ्यांच्या पिकांची चांगली वाढ होत होती. मात्र, मागील महिन्याभरात सोयाबीन पिकावर विविध रोग व अळ्यांचा प्रादुर्भाव झाल्याने पिके मोठ्या प्रमाणात नष्ट झाली असून शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला गेला आहे. सततच्या पावसामुळे शेतकरी आणखी संकटात सापडले आहेत.१६ ऑगस्टपासून झालेल्या अतिवृष्टीनंतर जिल्ह्यात पावसाची सतत धार सुरू आहे. परिणामी पिकांची आंतरमशागत आणि फवारण्या करणे कठीण झाले. सोयाबीन व कापूस पिके पाण्याखाली गेली. बुरशीजन्य रोग, यलो मोझॅक, पिवळेपणा, तसेच लष्करी व इतर अळ्यांचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.या पार्श्वभूमीवर अकोला तालुका कृषी विभागाकडून बोरगाव मंजू व परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतांवर प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. गुरुवार, ४ सप्टेंबर रोजी झालेल्या या पाहणीमध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून धीर देण्यात आला.यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे, अकोला तालुका कृषी अधिकारी विलास वाशीमकार, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. प्रकाश घाटोळ, डॉ. श्रीकांत ब्राम्हणकर, डॉ. पी.के. राठोड, उपकृषी अधिकारी मनीषा जोशी, सहायक कृषी अधिकारी संजय जाधव, अजय देशमुख आदी अधिकारी उपस्थित होते.अनवी, मिर्झापुर, राजापूर, पैलपाडा परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतांवर ही पाहणी घेण्यात आली. यावेळी संजय बसू, पवन जयस्वाल, मोहन नवलकर, विकास पाटील, शंकर वसु, बाबाराव धोत्रे, सागर राऊत, दिलीप लहाने, गुलाब नागे, देवानंद नायडेकर, प्रकाश लहाळे आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

READ ALSO : https://ajinkyabharat.com/gulabrao-patalanche-nearby-sudden-disappearance/