सराफा बाजारात आज सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली.
बुधवारी म्हणजेच ११ सप्टेंबर रोजी सोनं ४७२ रुपयांनी महागलं,
तर चांदी ७४७ रुपयांनी महागली. आज २४ कॅरेट सोन्याचा
Related News
सालासर बालाजी मंदिरात भव्य हनुमान जन्मोत्सव; प्रयागराज कुंभमेळ्याचा देखावा विशेष आकर्षण
तेल्हारा येथे शिवसेनेची आढावा बैठक संपन्न; स्थानिक स्वराज्य निवडणुकांची जोरदार तयारी सुरू
आठवड्यातून तीन दिवस अमरावती-मुंबई विमानसेवा सुरु
नगर परिषद शिक्षक सहकारी पत संस्था अकोटच्या अध्यक्षपदी तसलीम ताहेर पटेल यांची अविरोध निवड
शतकानुशिक परंपरेची साक्ष — आसरा माता यात्रा भक्तिभावात पार
ज्ञानेश्वर वरघट पेडगाव वार्ताहर कळंबा बोडखे येथील जनतेचा पाण्यासाठी आक्रोश
अकोला रेल्वे स्टेशन परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी जेरबंद
शेतकरी आत्महत्या ग्रस्त निराधार बालकांना शिक्षणासाठी मदतीचा हात; माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते आर्थिक मदत वाटप
शेकडो तरुणांचा शिवसेनेत प्रवेश; अकोट तालुका आढावा बैठक उत्साहात पार
सुरत कलकत्ता हायवे क्रमांक त्रेपन्न वर भीषण अपघात; कार चालक गंभीर जखमी
गौण खनिज प्रकरणात पेंडींग असलेल्या दंडाची वसुली रखडली; तहसीलदारांवर टिका
परप्रांतीय कंपन्यांची मुजोरी मोडत स्थानिकांना मिळवून दिला रोजगार….
भाव ७२०२२ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. मंगळवारी सोन्याचा
भाव ७१,५९० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाला होता. तर चांदीही
७४७ रुपयांनी वधारून ८२,९५४ रुपये प्रति किलो ग्रॅम झाली आहे.
सोने आणि चांदीचे हे दर आयबीजेएनं जाहीर केले आहेत. यावर
जीएसटी आणि ज्वेलरी मेकिंग चार्जेजचा समावेश नाही.
आपल्या शहरातील सोन्या- चांदीच्या दरात १००० ते २०००
चा फरक असण्याची शक्यता आहे. आज २३ कॅरेट सोन्याचा भाव
४३१ रुपयांनी वाढून ७१,७३४ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. मात्र,
२२ कॅरेट सोन्यासाठी ६५,९७२ रुपये प्रति १० ग्रॅम मोजावे लागतील.
आज २२ कॅरेट सोन्यात ३९६ रुपयांची वाढ नोंदवण्यात आली. आज
१८ कॅरेट सोन्याचा भाव ३२४ रुपयांनी वाढला असून तो ५४,०१७ रुपये
प्रति १० ग्रॅम दराने उघडला. तर १४ कॅरेट सोन्याचा भाव २५३ रुपयांनी
वाढून ४२१३३ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. जीएसटीमुळे २४ कॅरेट
सोन्याचा भाव आता ७४,१८२ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. यामध्ये
२१६० रुपये जीएसटीचे जोडलेले आहेत. तर जीएसटीसह २३ कॅरेट
सोन्याची किंमत ७३,८८६ रुपये आहे. ३ टक्के जीएसटीनुसार यात २१५२
रुपयांची भर पडली आहे. २२ कॅरेट सोन्याबद्दल बोलायचं झालं तर आज
ते जीएसटीसह ६७,९५१ रुपयांवर पोहोचलं. यात १९७९ रुपये जीएसटीचा
समावेश आहे. १६२० रुपयांचा जीएसटी जोडल्यानंतर १८ कॅरेट सोन्याचा
भाव आता ५४,०१७ रुपये झालाय. त्यावर ज्वेलरी मेकिंग चार्ज आणि
ज्वेलर्सचा नफा यांचा समावेश नाही. जीएसटीसह एक किलो चांदीचा भाव
८५,४४२ रुपयांवर पोहोचला आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/soon-haryana-chief-minister-nayab-singh-saini-will-resign/