राजकारणात येण्यास सोनाक्षी सिन्हाचा स्पष्ट नकार

राजकारणात येण्यास सोनाक्षी सिन्हाचा स्पष्ट नकार

मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘हीरामंडी : द डायमंड बाजार’ या वेबसिरीजमुळे प्रचंड चर्चेत आहे. या वेब सिरीजमध्ये तिने फरीदाची भूमिका साकारलीये. तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांची भरभरून दाद मिळतेय. वेब सिरीजच्या प्रमोशन दरम्यान, सोनाक्षीला राजकारणात प्रवेश करण्याबद्दल एक प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नावर सोनाक्षीने असं काही उत्तर दिलंय ज्यामुळे सर्वांची बोलतीच बंद झालीये.

सोनाक्षीचे वडील शत्रुघ्न सिन्हा दिग्गज सुप्रसिद्ध अभिनेते आहेत. अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलंय आणि आता ते राजकारणात सक्रीय आहेत. सोनाक्षीला एका मुलाखतीत विचारण्यात आलं की, तिला राजकारणात यायला आवडेल का? यावर तिने दिलेल्या उत्तरामुळे सगळेच थक्क झाले.

सोनाक्षी राजकारणात येणार?
सोनाक्षी म्हणाली की, ‘नाही. कारण तिथे सुद्धा तुम्ही लोक नेपोटीजम-नेपोटीजम करणार’. ‘ती खूप प्रायव्हेट पर्सन असून तिच्या वडिलांसारखी पब्लिक पर्सन नाहीये. त्याचबरोबर तिच्यामध्ये राजकारणी बनण्याचे कोणतेही गुण नाहीयेत. जर लोकांना काही सांगायचं असेल तर त्यांच्यापर्यंत आधी पोहोचता यायला पाहिजे आणि दोघांमध्ये पारदर्शकता असली पाहिजे’, असं सोनाक्षी पुढे म्हणाली.

Related News

राजकारणाबाबत सोनाक्षी काय म्हणाली?
सोनाक्षी पुढे म्हणाली की, ‘मला नाही वाटत मी असं कधी कारेन कारण माझ्या वडिलांना ह्या क्षेत्रात मी पाहिलंय. मला नाही वाटत की राजकारणात प्रवेश करण्याची माझी योग्यता आहे. माझ्या वडिलांना लोकांकडून खूप प्रेम मिळालंय आणि ते लोकांचे आवडते आहेत. राजकारणात येण्यासाठी जनतेचा नेता बनणं महत्वाचं असतं. तुम्हाला त्यांच्यासाठी नेहमीच उपस्थित राहायला पाहिजे. मी माझ्या वडिलांना पाहिलंय त्यामुळे मला असं वाटतं की ते गुण माझ्यात नाहीत’.

Related News