मुंबई : बॉलिवूडचे लोकप्रिय अभिनेते अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. दोघांमध्ये एका महत्त्वाच्या विषयावरुन वाद झालेला पाहायला मिळतो आहे, या व्हिडिओत दिग्दर्शक-अभिनेते सौरभ शुक्लाही दिसत आहेत. वाचा या अभिनेत्यांमध्ये कशावरुन वाद झाला आहे.
कशावरुन झाला आहे वाद?
तर अक्षय आणि अर्शद या दोन्ही कलाकारांनी त्यांचा आगामी सिनेमा ‘जॉली एल. एल. बी ३’च्या शूटिंगला सुरुवात केली असून खरा जॉली कोण यावरुन त्यांचा वाद झाला आहे. ‘जॉली एल. एल. बी’ आणि ‘जॉली एल. एल.बी. २’ या सिनेमांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते. पहिल्या सिनेमात अभिनेता अर्शद वारसी जगदीश त्यागी उर्फ जॉली या भूमिकेत होता, तर दुसऱ्या सिनेमात अक्षय कुमार जगदीश्वर मिश्रा उर्फ जॉली या भूमिकेत होता. आता खरा कोण आणि बनावट कोण, असा सवाल करणारा हा प्रमोशनल व्हिडिओ आहे.
जेव्हापासून जॉली LLB ३साठी अक्षय आणि अर्शद एकत्र काम करणार आहेत, हे समोर आले आहे तेव्हापासून प्रेक्षकांच्या आनंदाला पारावार उरलेला नाही. आता त्यांनी खरा जॉली कोण आणि खोटो कोण, असा सवाल करत प्रेक्षकांची उत्सुकता अधिक ताणून धरली आहे. त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओत दोघेही वकिलाच्या भूमिकेत दिसत आहेत, दोघेही स्वत:ला खला जॉली तर दुसरा बनावट असल्याचे ठामपणे सांगत आहेत.
Related News
लोकप्रिय टीव्ही अभिनेता करण वाहीने त्याच्या रिलेशनशिपबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. एका पॉडकास्टमध्ये त्याने दावा केला की त्याची गर्लफ्रेंड एकाच वेळी...
Continue reading
मलायका अरोरासोबतच्या ब्रेकअपनंतर अभिनेता अर्जुन कपूर पुन्हा प्रेमात असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. लंडनमधील लॉर्ड्स मैदानावर साहिबा बालीसोबत दिस...
Continue reading
सलमान खानची माजी प्रेयसी सोमी अलीने दिव्या भारती, अंडरवर्ल्ड आणि दिव्या भारतीच्या मृत्यूबाबत धक्कादायक दावे केले आहेत. तिच्या मुलाखतीतील नेमकं वक्तव्य...
Continue reading
SRA कार्यालयातील कार्यक्रमात सलमान खानचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांनी त्याच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली आहे. कृश शरीरयष्टी, सुजलेले डोळे आणि ...
Continue reading
अभिनेत्री सविता मालपेकर यांनी मुलगी केतकी 10 दिवस कोमात असताना आलेल्या भीषण प्रसंगाचा आणि स्वामी समर्थांच्या नामस्मरणातून मिळालेल्या मानसिक बळाचा...
Continue reading
सोहेल खानने मुलाचे नाव 'राम खान' ठेवण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र सीमाच्या एका शब्दामुळे नाव 'निर्वाण' ठेवण्यात आले. घटस्फोटानंतर मुलं कुणासोब...
Continue reading
‘Dhamaal 4’ची बॉक्स ऑफिसवर धडाकेबाज कामगिरी; 9 दिवसांत 100 कोटींचा टप्पा पार, कमाईचा वेग कायम
बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा बहुप्रतीक्षित कॉमेडी चित्रपट
Continue reading
बॉलिवूड अभिनेता अर्शद वारसीने 2012 मध्ये 2.12 कोटींना खरेदी केलेली अंधेरीतील कमर्शियल प्रॉपर्टी 2026 मध्ये 6.25 कोटींना विकली. या व्यवहारातून त्याल...
Continue reading
व्हायरल वैदूच्या व्हिडिओंवर अभिनेता गिरीश परदेशी यांनी स्पष्ट भूमिका घेत लहान मुलांच्या संस्कार, सोशल मीडिया प्रसिद्धी आणि पालकांच्या जबाबदारीवर भ...
Continue reading
Lock Upp 2 मधून एलिमिनेट झाल्यानंतर सुनीता आहुजाने 3 स्पर्धकांवर गंभीर आरोप करत धक्कादायक खुलासे केले. गोविंदाचे आभार मानत राम कपूरचे कौतुक आणि शोती...
Continue reading
धमाल 4 Box Office Collection Day 2: 36.50 कोटींचा ऐतिहासिक धमाका! दुसऱ्याच दिवशी 25 चित्रपटांना मागे टाकत 60% जबरदस्त वाढ
बॉलिवूडचा सिंघम अजय देवगण पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनाव...
Continue reading
अक्षयने व्हिडिओ शेअर करताना असे कॅप्शन दिले आहे की, ‘आता ओरिजिनल कोण आणि डुप्लिकेट कोण हे तर माहीत नाही, पण हा प्रवास खूप जॉली असणार आहे हे मात्र नक्की. आमच्यासोबत राहा, जय महाकाल!’ व्हिडिओमध्ये अर्शद असे म्हणतो की, ‘जगदीश त्यागी, बीए एल. एल.बी…. डुप्लिकेटपासून सावधान’. तर अक्षय म्हणतो की, ‘जगदीश्वर मिश्रा, बीए एल. एल. बी…. ओरिजनल जॉली, लखनऊ वाले’. तर शेवटी सौरभ शुक्ला यांच्या हातात एक पाटी दाखवण्यात आली आणि त्यावर असे लिहिले आहे की, ‘जॉली एल. एल. बी. ३ च्या शूटिंगला सुरुवात’.
‘जॉली एल. एल. बी’ सिनेमाचे पहिले दोन भाग दिग्दर्शक सुभाष कपूर यांनी दिग्दर्शित केले होते, तेच तिसऱ्या भागाचेही दिग्दर्शन करणार आहेत. पुढील वर्षी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.