Historian Indrajeet Sawant Death Threat : सध्या ‘छावा’ने देशभरात धुमाकूळ घातला आहे. त्यातच इतिहास
अभ्यासक इंद्रजीत सावंत यांच्यावर ब्राह्मण द्वेषाचा आरोप करत त्यांना
जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यावर आता नागपूरमधून मोठा खुलासा आला आहे.
इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना घरात घुसून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
Related News
त्यांनी याविषयीचे कॉल रेकॉर्डिंग फेसबूकवर पोस्ट केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
सावंत ब्राह्मण द्वेष पसरवत असल्याचा आरोप करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.
कॉल करणाऱ्याने आपण नागपूर येथून बोलत असल्याचा दावा केला. प्रशांत कोरटकर असं
धमकी देणाऱ्या व्यक्तीचे नाव असल्याचे सावंत यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. तर दुसरीकडे नागपूर येथील
प्रशांत कोरटकरच याप्रकरणी समोर आले. त्यांनी हे सर्व दावे फेटाळले आहेत.
आपल्याला बदनाम करण्यासाठी कोणीतरी हा खोडसाळपणा केल्याचा दावा त्यांनी केला.
काय आहे फेसबुक पोस्ट?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेऊन नागपूरमधील प्रशांत कोरटकर यांनी आपल्याला धमकी
दिल्याचा दावा इंद्रजीत सावंत यांनी केला आहे. अशा धमक्या आपल्याला नवीन नाही.
आपण अशा धमक्यांना भीक घालत नसल्याचा दावा सावंत यांनी केला. त्यांनी या पोस्टमध्ये प्रशांत
कोरटकर यांचे नाव घेतले आहे. त्यांनी असा कॉल केल्याची माहिती त्यांनी पोस्टमध्ये दिली आहे.
कॉल रेकॉर्डमध्ये काय काय?
या कॉल रेकॉर्डमध्ये इंद्रजीत सावंत यांच्यावर ब्राह्मण द्वेष पसरवत असल्याचा आरोप करण्यात आला.
आपण नागपूर येथून प्रशांत कोरटकर बोलत असल्याचा दावा कॉल करणाऱ्याने केला.
तर सावंत यांनी आपले नाव गुगलवर शोधण्यास त्याने सांगितले.
त्याने सावंत यांना अश्लाघ्य शिव्यांची लाखोली वाहिली.
तर ब्राह्मणांची ताकद दाखवून देण्याची धमकी देण्यात आली.
तर कॉल करणाऱ्याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल
अवमानकारक वक्तव्य केल्याचे सावंत यांचे म्हणणे आहे.
सावंतांविरोधात अब्रुनुकसानीचा खटला करणार
तर याप्रकरणात नागपूर येथील प्रशांत कोरटकर यांनी आपण इंद्रजीत सावंत यांना ओळखत नाही.
आपल्या नावाने कोणीतरी खोडसाळपणा केला असा दावा त्यांनी केला. नवीन तंत्रज्ञानाचा गैरवापर
करून कोणीतरी फसवण्याचा प्रयत्न करत असल्याचे ते म्हणाले. यापूर्वी 15वेळा आपले फेसबुक हॅक करण्यात आले.
आपला नंबर सुद्धा हॅक झाल्याचा दावा कोरटकर यांनी केला. तर सावंत यानी अगोदर
आपल्याशी बोलून फेसबुक पोस्ट करायला हवी होती, असे ते म्हणाले.
याप्रकरणी पोलिसांमध्ये आणि सायबर पोलिसांकडे तक्रार देणार असल्याचे कोरटकर म्हणाले.
त्यांनी इंद्रजीत सावंत यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा खटला करणार असल्याचा इशारा दिला.
सध्याच्या घडामोडींवर सावंतांचे मोठे भाष्य
‘महाराष्ट्रात अनेक वर्ष अनेक जातीच्या समूहांच्या व्यक्तींचं मुख्यमंत्रीपद त्यांनी भूषविलं आहे.
पण कधीच कुणी जातीचा गंड दाखवून विधान केलं नव्हतं.
Read more news here : https://ajinkyabharat.com/raj-uddhav-thackeray-collected-yenar-sanjay-rautanchi-first-response-in-reaction/