सायरन कधी वाजतो? – हवाई हल्ल्याच्या धोक्यावेळी नागरिकांना मिळतो किती वेळ वाचण्यासाठी?

सायरन कधी वाजतो? – हवाई हल्ल्याच्या धोक्यावेळी नागरिकांना मिळतो किती वेळ वाचण्यासाठी?

नवी दिल्ली, ८ मे – पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे

पाकिस्तानात ठाण मांडलेल्या नऊ दहशतवादी तळांवर अचूक कारवाई केली. या घडामोडीनंतर

भारत-पाकिस्तानमधील तणाव टोकाला गेला असून देशात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.

Related News

या पार्श्वभूमीवर भारत सरकारने ७ मे रोजी देशव्यापी मॉक ड्रिल आणि ब्लॅकआउट आयोजित केला.

यामध्ये नागरिकांना हवाई हल्ल्याच्या धोका निर्माण झाल्यास स्वत:चा जीव कसा वाचवायचा,

याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी हवाई हल्ल्याचा इशारा देणारा सायरन देखील वाजवण्यात आला,

ज्यामुळे नागरिकांमध्ये उत्सुकता आणि काळजी निर्माण झाली – नेमका हा सायरन कधी वाजतो? आणि जीव वाचवण्यासाठी किती वेळ मिळतो?

 सायरन कधी वाजतो?

जेव्हा शत्रू राष्ट्राकडून रॉकेट, लढाऊ विमान किंवा क्षेपणास्त्र भारताच्या हवाई हद्दीत प्रवेश करतात, तेव्हा हवाई

दलाचे रडार तत्काळ ते ओळखतात. त्या आधारे संभाव्य हल्ल्याच्या ठिकाणी ६० सेकंदांचा एअर रेड सायरन वाजवला जातो.

या सायरनचा अर्थ – नागरिकांनी त्वरीत सुरक्षित स्थळी जायला हवं.

 जीव वाचवण्यासाठी मिळतो किती वेळ?

हल्ल्याची शक्यता असलेल्या भागात हा सायरन वाजवण्यात येतो, ज्यामुळे लोकांना फक्त सुमारे एक मिनिट

मिळतो स्वतःचा जीव वाचवण्यासाठी. हा सायरन वाजल्यावर तातडीने जवळच्या बंकरमध्ये किंवा सुरक्षित इमारतीच्या खालील मजल्यावर जाण्याचा सल्ला दिला जातो.

 सायरन मागचं तंत्रज्ञान काय?

रडार प्रणाली शत्रूच्या हालचाली ओळखते आणि त्या आधारे तात्काळ रेड अलर्ट जारी केला जातो.

त्यानंतर स्थानिक यंत्रणांमार्फत सायरन सक्रिय केला जातो. ही प्रणाली मुख्यतः लष्करी तळ, विमानतळ तसेच संवेदनशील नागरी भागांमध्ये कार्यरत असते.

भारतीय नागरिकांना अशा संकट काळात सजग राहून प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/district-chief-srirang-pinjarkar-yancha-call/

Related News