श्रमदानातून रस्त्यावर पडलेल्या भेगा बुजविण्याचे केले काम..

अकोला

काल शेगाव टी पॉइंट येथे झालेल्या अपघातानंतर उर्जित फाऊंडेशनचा पुढाकार
प्रशासनाने लक्ष देण्याची नागरिकांची मागणी

काल दिनांक 6 जून रोजी अकोला खामगांव मार्गावरील अकोला शेगांव

Related News

टी पॉइंट वर घडलेला अपघात हा अतिशय दुर्दैवी होता, या अपघातात दोन

युवकांनी आपले प्राण गमावले. सदर अपघात हा रस्त्यावरील भेगांमध्दे दुचाकी चे

चाक अडकल्यामुळे झाल्याचे सांगण्यात येत आहे. आज उर्जित फाउंडेशन

च्या वतीने अपघात घडला त्या ठिकाणी श्रमदान करून रस्त्यावर असलेल्या भेगा

बुजवण्याचे काम करून प्रशासनाला सदर बाबीत लक्ष देण्याची विनंती करण्यात आली आहे.

प्रशासन या रस्त्यावर आणखी किती बळी घेणार असा प्रश्न नागरिकांच्या वतीने उपस्थित करण्यात येत आहे.
श्रमदान करतेवेळी बाळू खूपसे, गजानन कोकणे, संदिप गोखले, रवि काळे, संतोष चितोडे, विनोद

पवार, निखिल पाठक, गणेश चौहान, विजय राऊत, राजू ठाकूर, प्रविण देवांग,

आनंद महल्ले, मुकूंद डोंगरे, मुन्ना चौहान, संदीप कुटे, चेतन शंकरपुरे, स्वप्नील

शंकरपुरें, ऋषी ठाकरे, नितीन काटकर, विलास काशीद इत्यादी उपस्थित होते.

Read Also

https://ajinkyabharat.com/muskya-avadalya-of-home-burglars-in-barshitakaali/

Related News