पीकविम्या संदर्भात शिवसेनेचे (उबाठा) आमदार आक्रमक!

पीक विम्या

पीक विम्या संदर्भात आता उबाठा शिवसेना आक्रमक झाली आहे.

अकोल्यातील बाळापूर मतदार संघाचे शिवसेना उबाठा गटाचे

आमदार नितीन देशमुख यांनी बाळापूर नगर परिषद हॉलमध्ये

Related News

कृषी अधिकारी आणि तहसिलदार यांना कोंडले आहे.

बाळापूर नगर परिषद येथे पीक विमा संदर्भात

शिवसेना उबाठा गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी

तातडीची बैठक बोलावली होती. मात्र या बैठकीला

पीक विमा कंपनीचे अधिकारी पोहचलेचं नाही.

आमदारांनी फोन लावले तरी देखील विमा कंपनीचे अधिकारी,

प्रतिनिधी न आल्याने शेवटी संतप्त आमदारांनी जो पर्यंत शेतकऱ्यांना

न्याय मिळणार नाही तो पर्यंत नगर परिषद हॉलचे दरवाजे उघडणार नाही व

तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी यांना बाहेर सोडणार नाही

असा पवित्रा घेतला. यावेळी मोठ्या संख्येत शेतकरी उपस्थित होते.

तहसिलदार आणि कृषी अधिकारी यांनी देशमुख यांची

समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र देशमुख आपल्या निर्णयावर ठाम आहेत.

Read also: https://ajinkyabharat.com/the-police-agreed-with-the-cow-smuggler-and-smiled-loudly/

Related News