शिवसेना पक्ष आणि चिन्हाची सुनावणी पुन्हा लांबणीवर

महाराष्ट्रानं

महाराष्ट्रानं गेल्या दोन वर्षांत अनेक राजकीय भूकंप अनुभवले. शिवसेनेतील

अंतर्गत बंडाळीमुळे राज्याच्या राजकारणाला नवं वळण मिळालं.

न भूतो न भविष्यती, अनेक अविश्वसनिय घडामोडी घडल्या आणि हा लढा थेट कोर्टात पोहोचला.

Related News

सध्या शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतचं प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे.

आता या प्रकरणाची सुनावणी पुन्हा लांबणीवर पडली आहे.

या प्रकरणाच्या सुनावणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून मुहूर्त सापडत नाही आहे.

20 ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणावरील सुनावणी पार पडणार होती.

पण, आता ही सुनावणी तब्बल महिनाभर पुढे ढकलली आहे.

त्यामुळे आता या प्रकरणाचा सुनावणीसाठी तब्बल महिनाभरानंतरच सर्वोच्च न्यायालयाच्या

कामकाजात समावेश होण्याची शक्यता असल्याची माहिती मिळत आहे.

निवडणूक आयोगानं पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिल्यानं ठाकरे गटाच्या

वतीनं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.

शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा निकाल तसेच आमदार अपात्रतेचा निकाल हा राज्याच्या

राजकारणाला मोठी कलाटणी देणारा आहे. परंतु मागच्या अनेक महिन्यांपासून

शिवसेनेच्या सत्तासंघर्षाची सुनावणी झालेली नाही. त्यामुळ या प्रकरणाचा निकाल

थेट विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लागण्याची शक्यता आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/imas-letter-to-the-prime-minister-raising-questions-regarding-the-safety-of-doctors/

Related News