शेतकऱ्यांना सरसकट मदतीचं आश्वासन

ओल्या दुष्काळावर काय म्हणाले फडणवीस ?

राज्यात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. पिकांचे, घरांचे आणि धान्याचे मोठं नुकसान झाल्याने शेतकरी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करत आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात पोहोचले आणि नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.शेतकऱ्यांशी संवाद साधताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “मराठवाड्यात ढगफुटीसदृष्य पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे. शासन म्हणून आम्ही सर्व निकष बाजूला ठेवून सर्व शेतकऱ्यांना सरसकट मदत करू. ज्यांच्या घरात पाणी शिरलं, दुकानांचं नुकसान झालं त्यांनाही शासन मदत करणार आहे. आम्ही कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही.”दरम्यान, शेतकऱ्यांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली. यावर बोलताना फडणवीस म्हणाले, “टंचाई म्हणजे दुष्काळ. पण या वेळी जशा उपाययोजना टंचाईच्या वेळी केल्या जातात, तशाच सर्व उपाययोजना लागू केल्या जाणार आहेत.”

अजित पवारांचे स्पष्टीकरण

ओला दुष्काळ जाहीर करण्याबाबत विचारले असता उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, “विरोधक म्हणून अशा मागण्या करणे स्वाभाविक आहे. मात्र सत्तेत असताना मार्ग काढावा लागतो. आज राज्य सरकारचे जे नियम आहेत ते बाजूला ठेवण्याची आमची तयारी आहे. पण ओला दुष्काळ जाहीर करण्याची शक्यता नाही. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आम्ही कुठेही कमी पडणार नाही.”

read also :  https://ajinkyabharat.com/guruchaya-mritunantantar-disciple-kabritun-dead-body/

Related News

Related News