मुर्तिजापूर, दि. १० (तालुका प्रतिनिधी):
तालुक्यातील रसुलपूर, विराहीत, कानडी या गावांतील शेतकऱ्यांनी नापिकी, शेतमालाला न मिळालेला आधारभूत भाव,
विमा व दुष्काळी मदतीचा अभाव यामुळे आत्महत्येचा मार्ग पत्करला.
Related News
बारामुल्ला येथे घुसखोरीचा प्रयत्न उधळला; दोन दहशतवाद्यांना कंठस्नान,
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाईंड कोण?
धारगड येथे वयोवृद्ध महिलेस प्राणघातक मारहाण;
हनीमूनसाठी युरोपला जाणार होते विनय आणि हिमांशी
श्रीनगरहून येण्यासाठी विमान तिकीटांचे दर तिप्पट;
धावत्या क्रूझरने घेतला पेट;
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ यवतमाळात शिवसेनेचे तीव्र आंदोलन
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केल्या शोकभावना
आधी काडी केली अन् आता भीतीने पाकिस्तानी एअरफोर्स हाय अलर्टवर
पहलगाम दहशतवादी हल्ला : संशयितांचे स्केच जारी, संशयितांची कसून चौकशी
दुपारी लागलेल्या भीषण आगीत घर जळून खाक…
शिवसेना (ठाकरे गट) चे जिल्हाप्रमुख गोपाल दातकर अर्ज फेटाळला
या आत्महत्या ग्रस्त कुटुंबांतील निराधार बालकांना आधार देण्यासाठी जनमंच,
आंतरभारती व प्रगती शेतकरी मंडळ टीम मुर्तिजापूर यांच्या वतीने ‘
ओली संवेदना’ या ग्रुपवर मदतीचे आवाहन करण्यात आले होते.
सदर आवाहनाला केवळ दोन तासांतच उत्तम प्रतिसाद मिळत ३५ हजारांची मदत जमा झाली,
जी पुढे ७० हजारांपर्यंत वाढली. यामध्ये रसुलपूर येथील हरणे
कुटुंबातील बालकांसाठी ४५ हजार रुपयांची रक्कम शिक्षणासाठी देण्यात आली.
या मदतीचे वाटप माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी त्यांनी रसुलपूर येथील हरणे, विराहीत येथील व कानडी येथील गावंडे कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
कार्यक्रमास प्रगती शेतकरी मंडळाचे अध्यक्ष राजू साहेबराव वानखडे,
जनमंचचे प्रा. गौरखेडे, आंतरभारतीचे प्रमोद राजंदेकर, तसेच काळे, अभी पोळकट, नंदकिशोर बबानिया,
प्रफुल्ल मालधुरे, राजू काळे, सुभाष मोरे, गजानन मोरे, अरुण बोंडे, श्रीकांत वानखडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
या उपक्रमातून समाजात संवेदनशीलता व एकोप्याची भावना जागृत झाल्याचे चित्र पहावयास मिळाले
असून, शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना दिलासा देणारा हा उपक्रम म्हणून त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.