दहिगाव अवताडे, शेतकरी फार्मर आयडी काढण्यासाठी शेतकऱ्यांचे लक्ष वेधण्यासाठी ग्राम दहिगाव
अवताडे येथे एक विशेष उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमात गावातून शेतकऱ्यांची
दिंडी काढून घोषणांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली.
Related News
आठवड्यातून तीन दिवस अमरावती-मुंबई विमानसेवा सुरु
नगर परिषद शिक्षक सहकारी पत संस्था अकोटच्या अध्यक्षपदी तसलीम ताहेर पटेल यांची अविरोध निवड
शतकानुशिक परंपरेची साक्ष — आसरा माता यात्रा भक्तिभावात पार
ज्ञानेश्वर वरघट पेडगाव वार्ताहर कळंबा बोडखे येथील जनतेचा पाण्यासाठी आक्रोश
अकोला रेल्वे स्टेशन परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी जेरबंद
शेतकरी आत्महत्या ग्रस्त निराधार बालकांना शिक्षणासाठी मदतीचा हात; माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते आर्थिक मदत वाटप
शेकडो तरुणांचा शिवसेनेत प्रवेश; अकोट तालुका आढावा बैठक उत्साहात पार
सुरत कलकत्ता हायवे क्रमांक त्रेपन्न वर भीषण अपघात; कार चालक गंभीर जखमी
गौण खनिज प्रकरणात पेंडींग असलेल्या दंडाची वसुली रखडली; तहसीलदारांवर टिका
परप्रांतीय कंपन्यांची मुजोरी मोडत स्थानिकांना मिळवून दिला रोजगार….
अकोटात सद्भावना आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन
भगवान महावीर जयंतीनिमित्त अकोल्यात भव्य रॅलीचे आयोजन
यानंतर विशेष शिबिराचे आयोजन करून शेतकऱ्यांना फार्मर आयडीचे महत्त्व समजावण्यात आले.
फार्मर आयडीमुळे शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता,
पीक विमा, पोकरा योजना, अनुदान अशा विविध शासकीय योजनांचा लाभ मिळू शकतो.
त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला फार्मर आयडी तात्काळ काढावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
या विशेष शिबिरात सरपंच रविकिरण काकड, पोलिस पाटील अरविंद अवताडे, मंडळ महसूल
अधिकारी संजय साळवे, तलाठी डाबेराव, कृषी सहाय्यक अनिता डाबेराव, तंटामुक्त समिती
अध्यक्ष संतोष तायडे, उपसरपंच धरमसिंग सोळंके, ग्रामविकास अधिकारी राठोड मॅडम,
रास्त भाव दुकान चालवणारे मोहन अग्रवाल, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक अविनाश भारसकडे,
माजी सैनिक सुधाकर सुरळकर, कोतवाल ऋषिकेश चव्हाण तसेच अक्षय अवताडे,
शशिकांत बोरसे, शुभम इसापुरे, कैलास अवताडे यांनी सहभाग घेतला.
या उपक्रमात जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी व शिक्षकही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
शिबिराला ग्रामस्थांनी चांगला प्रतिसाद दिला.