शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसले – दमदार पावसाच्या प्रतीक्षेत खरीप हंगाम अडचणीत

शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसले – दमदार पावसाच्या प्रतीक्षेत खरीप हंगाम अडचणीत

उंबर्डा बाजार | वार्ताहर

मृग नक्षत्र अर्धवट सरूनही मान्सूनचा दमदार पाऊस अद्याप न झाल्याने शेतकरी चिंतेत आहे.

खरीप हंगाम सुरू होण्याच्या टप्प्यावर असताना, उंबर्डा बाजार

Related News

परिसरातील बळीराजा पेरणीसाठी आकाशाकडे डोळे लावून बसलेला आहे.

ज्यांच्या शेतात सिंचनाची व्यवस्था आहे, त्यांनी पेरणीला प्रारंभ केला असला तरी बहुतांश कोरडवाहू शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

हवामान खात्याच्या अंदाजावरून पावसाचे आगमन लवकर होईल, अशी आशा होती,

मात्र प्रत्यक्षात उष्णतेचा जोर कायम असून, बोअरवेल आणि विहिरींची पाणीपातळीही खालावली आहे.

या स्थितीत पाऊस लांबणीवर गेल्यास पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना दुबार पेरणीचा सामना करावा लागू शकतो.

काही अनुभवी शेतकरी पक्ष्यांची हालचाल, मुंग्यांचा वावर आणि हवेत उडणाऱ्या किड्यांच्या निरीक्षणातून पावसाचा अंदाज घेत आहेत.

सध्याच्या परिस्थितीत पेरणी थोडी उशिरा करणे फायदेशीर ठरेल,

असा सल्लाही शेती तज्ज्ञ देत आहेत.

मात्र निसर्गाचीच कृपा हवी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.


🔸 कोरडवाहू शेतकरी मान्सूनच्या प्रतीक्षेत
🔸 विहिरी व बोअरवेलची पाणीपातळी घटली
🔸 पेरणी उशिरा केल्यासही फायद्याची शक्यता
🔸 दुबार पेरणीचा धोका कायम

Read Also :   https://ajinkyabharat.com/bolerot-cow-dynasty-katdi-wahtuk-seized/

Related News