अकोला जिल्ह्यातील कारंजा (रमजानपूर) आणि नया अंदुरा येथील
शेतकऱ्यांसाठी नवीन संकट उभे राहिले आहे.
लघु पाटबंधारे विभागामार्फत कारंजा (रम) धरण (बॅरेज) बांधण्यात आले, परंतु या प्रकल्पामुळे
Related News
पातूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची सदस्य नोंदणी मोहीम सुरु
पातुर : शाहबाबू उर्सनिमित्त कव्वाली कार्यक्रमांचे आयोजन
” मौन रात्रीचा संवाद मनाशी “….
अकोट : पोपटखेड शेतशिवारातील बंद कारखान्यात व्यावसायिकाचा खून
अकोल्यात अल्पवयीन मुलीवर दुचाकीवरून पळवून नेऊन अत्याचार
जिल्हा परिषदेचा कारभार रामभरोसेच!
अकोल्यात उन्हाचा तडाखा! तापमान ४४.२ अंशांवर, राज्यातील सर्वाधिक
माझोड – बाभुळगाव रस्त्याच्या दुरुस्तीसाठी खासदार अनुप धोत्रे यांचा पुढाकार;
भाऊसाहेब पोटे विद्यालयात NMMS पात्र गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा
‘सहकारातून समृद्धी’ योजनेतून सहकार चळवळीला नवे बळ – नानासाहेब हिंगणकर
सावता परिषदेच्या पातूर तालुका अध्यक्षपदी अजय ढोणे यांची निवड
आर्थिक विवंचनेत अडकलेल्या युवक शेतकऱ्याची आत्महत्या
शेतकऱ्यांचे शेतरस्ते पूर्णतः पाण्याखाली गेले आहेत.
त्यामुळे शेतीची मशागत आणि पेरणी करणे कठीण झाले आहे.
नवीन रस्त्यांसाठी शेतकऱ्यांचे आमरण उपोषण
या गंभीर परिस्थितीमुळे कारंजा-रमजानपूर आणि नया अंदुरा येथील सुमारे २० शेतकऱ्यांनी धरणाच्या
भिंतीजवळ बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे.
शेतात जाण्यासाठी पर्यायी रस्त्यांची त्वरित सोय व्हावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
शेतकऱ्यांनी यापूर्वी अनेक वेळा अकोला जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी,
तहसीलदार बाळापूर, लघु पाटबंधारे विभाग तसेच स्थानिक आमदार आणि खासदार
यांच्याकडे निवेदने सादर केली होती. मात्र, प्रशासनाने अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही केली नाही.
त्यामुळे अखेर शेतकऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे.
शासनाच्या उदासीनतेमुळे शेतकऱ्यांमध्ये संताप
या प्रश्नावर प्रशासनाने त्वरित उपाययोजना न केल्यास आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांच्या मागण्यांची दखल घेऊन नवीन रस्त्यांची सोय केली नाही,
तर त्याचा मोठा परिणाम शेतीवर आणि स्थानिक अर्थव्यवस्थेवर होणार आहे.
शासन आणि संबंधित विभागाने या आंदोलनाची दखल घेऊन त्वरित शेतकऱ्यांच्या
समस्या सोडवण्याच्या दृष्टीने ठोस पावले उचलण्याची गरज आहे.
शेतकऱ्यांनी आपल्या न्याय्य हक्कांसाठी सुरू केलेले हे आंदोलन
त्यांच्या जीवनावश्यक गरजा भागवण्याचे एक महत्त्वाचे पाऊल आहे.