शेअर बाजारातील गोड उसळी : इथेनॉल धोरणामुळे साखर शेअर्स तेजीत
मुंबई – साखर उद्योगासाठी आजचा दिवस गोड ठरला आहे. सर्वोच्च न्यायालयाने २०% इथेनॉल मिश्रित पेट्रोल (E20) ला
आव्हान देणारी याचिका फेटाळून लावल्याने
आणि सरकारने इथेनॉल उत्पादनावरील निर्बंध शिथिल केल्याने साखर शेअर्सनी जोरदार उसळी घेतली.
बलरामपूर चिनी, श्री रेणुका, बजाज हिंदुस्तान,
उत्तम शुगर, त्रिवेणी इंजिनिअरिंगसह प्रमुख साखर कंपन्यांच्या शेअर्समध्ये १५% पर्यंत वाढ झाली.
कंपनीनुसार शेअर भाव वाढ
श्री रेणुका शुगर : १५.६७% वाढ, ३३.३० रु./शेअर
बलरामपूर चिनी मिल्स : ७% वाढ, ५८० रु./शेअर
उत्तम शुगर : १२% पेक्षा जास्त वाढ
बजाज हिंदुस्तान शुगर व गोदावरी बायोरिफायनरीज : ८% पर्यंत वाढ
धामपूर शुगर व मगध शुगर अँड एनर्जी : १०% पर्यंत वाढ
त्रिवेणी इंजिनिअरिंग : ४.५% वाढ
द्वारिकेश शुगर : ४% वाढ
सरकारने १ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या नवीन इथेनॉल वर्षासाठी सर्व प्रकारच्या मोलॅसेस,
सिरप आणि उसाच्या रसापासून इथेनॉल उत्पादनाला परवानगी दिली आहे.
त्यामुळे उद्योगपतींमध्ये उत्साह आणि गुंतवणूकदारांमध्ये आनंदाची लाट आहे.
गुंतवणूकदारांसाठी गोड बातमी, मात्र ग्राहकांच्या खिशावर भार
साखरेचे दर वाढल्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना महागाईचा फटका बसणार असला तरी,
गुंतवणूकदारांच्या खिशात मात्र खळखळाट झाला आहे.
Read also : https://ajinkyabharat.com/roshni-gangwe-yanchi-unique-gauri-decoration/