शरद पवार यांची उच्चस्तरीय चौकशीची भाजप आमदाराची मागणी; निवडणूक आयोगाला पत्र पाठवणार

शरद पवार यांची उच्चस्तरीय चौकशीची भाजप आमदाराची मागणी; निवडणूक आयोगाला पत्र पाठवणार

शरद पवार यांची उच्चस्तरीय चौकशीची भाजप आमदाराची मागणी; निवडणूक आयोगाला पत्र पाठवणार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विधानानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.

पवार यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी दोन व्यक्तींनी १६० जागा जिंकून देण्याची ऑफर दिल्याचा खुलासा केला होता.

या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी भाजप आमदार प्रशांत बंब यांनी केली आहे.

त्यांनी निवडणूक आयोगाला याबाबत लवकरच पत्र लिहिणार असल्याचं सांगितलं.

बंब यांनी म्हटलं की, पवार ईडीसमोर जसे स्वतःहून गेले तसेच या चौकशीला सामोरे जावं.

तसेच या प्रकरणात काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या कार्यालयाचीही तपासणी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.

बंब यांचा सवाल

बंब यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा दाखला देत विचारलं की, “दानवे यांच्या कडे असेच लोक आले होते, त्यांनी त्यांना तात्काळ पोलिसांच्या हवाली केलं.

मग पवारांनी त्या दोन लोकांना पोलिसांच्या ताब्यात का दिलं नाही? त्यांनी पोलिसांना ताबडतोब का कळवलं नाही?”

पवारांचा खुलासा

गेल्या आठवड्यात नागपूरमध्ये पत्रकार परिषदेत पवार म्हणाले होते —

“महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी दोन माणसं मला भेटायला आली. २८८ पैकी १६०  जागांवर विजय मिळवून देण्याची गॅरंटी ते देत होते. मतांची फेरफार करण्याबाबत ते बोलत होते. मात्र, निवडणूक आयोगाबद्दल माझ्या मनात संशय नव्हता, त्यामुळे मी त्याकडे दुर्लक्ष केलं. त्यानंतर त्यांची राहुल गांधींशी भेट झाली, पण आम्हा दोघांचा मतप्रवाह असा होता की हे चुकीचं आहे. आम्ही लोकांपर्यंत जाऊन त्यांचा आशीर्वाद घ्यावा, असाच मार्ग स्वीकारला.”

या खुलाशानंतर भाजपने पवारांवर निशाणा साधत त्यांच्या चौकशीची मागणी जोर धरू लागली आहे.

Read also :https://ajinkyabharat.com/wi-vs-pak-windies-malika-zinc-pakistan-hishob-karanar-face-decisive-today/