मुर्तिजापूर: भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 21 अंतर्गत जीवन जगण्याच्या मूलभूत अधिकारात अन्न,
वस्त्र आणि निवाऱ्याचा समावेश आहे. मात्र, शासन गरीब अतिक्रमण धारकांना हक्क प्रदान करण्यास
टाळाटाळ करत असल्याचा आरोप समाज क्रांती आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. हंसराज शेंडे यांनी केला आहे.
Related News
‘मोनिका ओ माय डार्लिंग’… ८६ व्या वर्षीही हेलेन यांचा जलवा कायम;
‘१२वी नापास, पण मोठमोठ्या वेबसाईट्स हॅक करणारे’
नवीन बस स्थानक टी पॉइंटवर अपघाताचा थरार;
शिवरमध्ये जागतिक शून्य सावली दिन संत विचारधनाने साजरा;
अकोल्यात झिरो शॅडो डेचा अनुभव; नागरिक म्हणाले – सावलीच नाहीशी झाली!
२४ मे २०२५ चं हवामान : वीकेंडला मुसळधार पावसाचा इशारा,
ऑपरेशन सिंदूरवरून प्रेरित ‘स्पेशल बनारसी साडी’;
पटना-गया आणि बक्सर दरम्यान लवकरच धावेल ‘नमो भारत एक्सप्रेस’;
“इंग्लंडचा रणसंग्राम! पहिल्याच दिवशी 498 धावा,
“वादळी वारे, मुसळधार पाऊस आणि रेड अलर्ट:
“पाकिस्तानच्या ‘पाण्याच्या’ धमकीवर भारताचा संताप;
“आर्यन खान तुरुंगात फक्त फळं आणि पाण्यावर;
राज्यघटनेच्या अनुच्छेद 12 नुसार SDO (उपविभागीय अधिकारी) यांनी सरकारी E आणि F क्लास जमिनीवरील
अतिक्रमण धारकांना महसूल कायदा 1966 च्या कलम 51 अंतर्गत नियमबद्ध करून मालकी हक्क द्यावा,
अशी मागणी शेंडे यांनी केली आहे. शासनाने लवकरात लवकर कारवाई न केल्यास “करो या मरो” आंदोलन छेडण्यात येईल,
असा इशाराही त्यांनी दिला.
शासनाकडून दुर्लक्षाचा आरोप
शेंडे यांनी प्रशासनावर टीका करताना सांगितले की, राजकीय दबावामुळे श्रीमंत भांडवलदार आणि राजकारणी लोकांना
महसूल कायद्यातील कलम 51 च्या आधारे सरकारी जमिनीचा मालक बनवले जाते.
मात्र, 30 ते 40 वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या गरीब जनतेच्या अतिक्रमणाचे नियमितीकरण करण्यास टाळाटाळ केली जात आहे.
आंदोलनाचा इतिहास
समाज क्रांती आघाडीने मागणीसाठी अनेकदा आंदोलन केले आहे:
- 15 ऑगस्ट 2019: आमरण उपोषण
- 4 ऑक्टोबर 2019: मोर्चा
- 15 ऑगस्ट 2024: पुन्हा आमरण उपोषण
यासोबतच, 25 मंजूर प्रस्ताव ऑनलाईन असूनही शासनाकडून कोणतीही ठोस पावले उचलली गेली नाहीत.
त्यामुळे शासनाने त्वरित निर्णय घ्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देण्यात आला.
मोर्चात असंख्य नागरिकांचा सहभाग
या आंदोलनात समाज क्रांती आघाडीचे जिल्हा संघटक सुदामभाऊ शेंडे,
तसेच निरंजन गवई, धममनंद तायडे, अजाबराव दामले, बंडू डोंगरे, नंदू नानिर, विनोद इंगळे, सतीश इंगळे,
धनराज सावंत, राजू अंभोरे, दिवाकर इंगळे, प्रवीण चाहकर, दादाराव सरदार, प्रकाश जमनिक,
चंद्रभान घने आदींसह मोठ्या संख्येने अतिक्रमण धारक उपस्थित होते.
— मा. सुदाम शेंडे (जिल्हा संघटक, समाज क्रांती आघाडी)
दिनांक: 27/02/2025
Read more news here : https://ajinkyabharat.com/swargate-rape-case/