शाळेवरून जाणाऱ्या थ्री-फेज वायरमुळे अपघाताचा धोका;

शाळेवरून जाणाऱ्या थ्री-फेज वायरमुळे अपघाताचा धोका;

हिवरखेड | प्रतिनिधी

हिवरखेड येथील वरिष्ठ उर्दू प्राथमिक शाळेच्या टिनपत्री छताजवळून जाणारी थ्री-फेज वीजवाहिनी

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी मोठा धोका ठरू शकते. शाळा प्रशासनाने व ग्रामस्थांनी वेळोवेळी महावितरणकडे तक्रारी करूनही

Related News

अद्याप कुठलीही ठोस कार्यवाही झाली नसल्याने विद्यार्थ्यांच्या जिविताचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

तीव्र अपघाताची शक्यता

उच्चदाब वीजवाहिनी ही शाळेच्या छताशी लागूनच गेल्याने वर्गात शिक्षण घेताना,

तसेच खेळाच्या वेळेस मुलांना स्पर्शाचा धोका कायम आहे. शिक्षक, पालक,

आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी महावितरणला जबाबदार धरत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

“या परिस्थितीवर वेळेवर तोडगा न काढल्यास कोणताही अनर्थ घडला,

तर त्याची पूर्ण जबाबदारी महावितरणवर राहील.”

— शेख शफी शेख खलील, अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती

शेकडो विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात

सध्या शाळेत ३०० ते ५०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यामुळे एक छोटीशी चूकही गंभीर दुर्घटनेचे कारण ठरू शकते.

पालकांनी देखील या धोक्यांकडे लक्ष वेधून महावितरण विभागाला तातडीची कार्यवाही करण्याचे आवाहन केले आहे.

“हिवरखेड परिसरात विद्युत केबल टाकण्याचे काम सुरू आहे.

याच प्रक्रियेत शाळेवरील वीजवाहिनी हटवून दुसऱ्या बाजूस वळवावी किंवा केबल टाकावी.”
— हिफाजत खान, पालक

महावितरणकडून केवळ आश्वासने

महावितरणच्या हिवरखेड येथील सहाय्यक अभियंता आशिष धांडे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की,

“केबल एजन्सी आल्यास तातडीने केबल टाकण्यात येईल.”

मात्र, हा विषय गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे, त्यामुळे केवळ आश्वासनावर समाधान न मानता तात्काळ

प्रत्यक्ष कार्यवाही होणे अत्यंत आवश्यक आहे, अशी मागणी ग्रामस्थ, पालक व शिक्षकांकडून होत आहे.

Related News