शेतकऱ्यांसाठी लाखो रुपयांच्या योजना : जि.प. कृषी विभागाची १५ ऑगस्टपूर्वी सभा

अकोला जिल्ह्यातील

अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी कृषी विभागातर्फे विविध योजना राबविण्यात येतात.

या सर्व योजनेतील लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी १५ ऑगस्टपूर्वी

कृषी विभागातर्फे सभा घेण्याची तयारी सुरू आहे.

Related News

जिल्हा परिषद उपकर अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनांमध्ये

९० टक्के अनुदान शासनातर्फे देण्यात येते. दहा टक्के हिस्सा रक्कम

लाभार्थ्याला भरावी लागते. शेतकऱ्यांना प्लास्टिक ताडपत्री पुरविण्यासाठी

२६ लाख ५० हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

प्रत्येक लाभार्थ्याला यासाठी ३२५० रुपये दर निश्चित करण्यात आला.

सर्वसाधारण ८६१ लाभार्थी व ४५ अपंग लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे.

सर्वसाधारण शेतकऱ्यांना एचडीपीई पाइप पुरविण्यासाठी दहा लाख रुपयांची तरतूद असून,

प्रति लाभार्थी सहा हजार पाचशे रुपये दर निश्चित करण्यात आला आहे.

१६२ सर्वसाधारण अपंग लाभार्थ्यांना याचा लाभ होईल.

स्पायरल सेपरेटर ग्रेडर साठी १३२ सर्वसाधारण शेतकरी तसेच

७ अपंग लाभार्थ्यांची  ही निवड करण्यात येणार आहे. बॅटरी ऑपरेटेड

पावर प्रेयर पुरविण्यासाठी १६ लाख ५० हजार रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे.

सर्वसाधारण ५८० व अपंग ३१ लाभार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे.

सोलर विद्युत झटका मशीनसाठी पाच लाख रुपयांची तरतूद असून,

७४ सर्वसाधारण व चार अपंग लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल,

अशी माहिती कृषी विभागातील वरिष्ठ लिपिक वंदना चौधरी यांनी दिली आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/11-dilapidated-polling-station-buildings-shifted-to-other-places/

Related News