अकोट (प्रतिनिधी विशाल आग्रे): तालुक्यातील सावरा गावात अरुण शालीग्राम सपकाळ यांच्या
घराला 2 एप्रिलच्या मध्यरात्री अचानक भीषण आग लागली.
रात्री 1 वाजता लागलेल्या या आगीमुळे संपूर्ण घर जळून खाक झाले असून,
Related News
बिहारमधील मतदार यादी पुनरिक्षणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान; ADRची याचिका
वारंवार तक्रार करूनही गटविकास अधिकारी यांची कारवाई करण्यास टाळटाळ
अकोला : 16 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग; ऑटोचालकाने घेतला हाताला आणि दंडाला चावा – आरोपीला अटक
अकोट | नऊ वर्षांच्या मुलाचा अमानुष खून – आईच्या जिवलगावरून जीव घेतला!
कापशी रस्त्यावरील अपूर्ण सर्विस रोड जीवघेणा ठरत आहे!
धामणा बुद्रुकमध्ये कॉलराचा उद्रेक; एका नागरिकाचा मृत्यू, गावात भीतीचं वातावरण
रिधोरा : नाग प्रजातीचा विषारी साप घरात आढळला;
पिंपळखुटा येथील चोरी गेलेले गोवंश पोलिसांनी पकडले
धामणा बुद्रुक येथे कॉलऱ्याचा शिरकाव; एकाचा मृत्यू, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
अकोल्यातील शेतकऱ्याचा मुलगा बनला ‘क्रिकेट पंच’
धोंडा आखर येथे ‘प्रधानमंत्री धरती आबा’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
परशुराम नाईक विद्यालयाचे तंबाखू मुक्त अभियान कौतुकास्पद – न्यायाधीश आर. एन. बंसल यांची प्रशंसा
लाखोंचे आर्थिक नुकसान झाले आहे. या घटनेत एक बैल आणि एक गाईचा होरपळून मृत्यू झाला.
आग लागल्याचे लक्षात येताच अरुण सपकाळ यांनी गावात आरडाओरड करून नागरिकांना जागे केले.
गावकऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र ती नियंत्रणात आणता आली नाही.
अखेर अकोट नगर परिषदेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली.
या आगीत घरातील भांडी, कपडे, धान्य (गहू, ज्वारी, तूर डाळ), दरवाजे,
बांबू आणि कवेलू पूर्णतः जळून खाक झाले. प्रशासनाने घटनेची पाहणी करून पंचनामा केला असून,
एकूण ₹2,75,000 चे नुकसान झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.
अरुण सपकाळ यांनी शासनाकडे तातडीने आर्थिक मदतीची मागणी केली आहे.