हाथरसमध्ये सत्संगात चेंगराचेंगरी, 122 मृत्यू!

रुग्णालयाबहेर

रुग्णालयाबाहेर मृतदेहांचा खच, दीडशेहून अधिक जखमी. 

उत्तर प्रदेशातील हाथरसमाये भोले बाबांच्या सत्संगादरम्यान

चेंगराचेंगरीची घटना मंगळवारी दुपारी घडली.

Related News

यामध्ये १२२ जणांचा मृत्यू झाला ता १५० हुन अधिक जखमी झाले आहेत.

अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे.

मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

अपघातानंतरची परिस्थिती भयावह आहे.

रुग्णालयाच्या बाहेर जमिनीवर मृतदेह विखुरलेले आहेत.

एकूण १२२ जण या दुर्घटनेत मरण पावले आहेत.

सीएमओ उमेश त्रिपाठी म्हणाले, की मृतदेह आणि जखमींना टेम्पोमध्ये आणण्यात आले.

मृतदेहांचा पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

सत्संगात २० हजारांहून अधिक लोकांची गर्दी होती,

ही घटना नेमकी का घडली, पांसदर्भातील तपास सुरू आहे.

दम्यान, या घटनेनंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मृतकांच्या नातेवाईकांना मदत जाहीर केली.

हाथरस प्रशासनाने खासगी रुग्णालयांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

प्रत्येकाला बेड आरक्षित करण्यास सांगितले आहे.

जखमींना आता खासगी रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे.

घटनास्थळी परिस्थिती नियंत्रणाबाहेर आहे.

गर्दी आणि मृतदेहांमध्ये प्रत्येकजण आपल्या प्रियजनांचा शोध घेत आहे.

हाथरसपासून ४७ किलोमीटर अंतरावर असलेल्या फुलराई गावात हा अपघात झाला.

अपघातानंतर कसेबसे जखमी आणि मृतांना बस-टेम्पोमध्ये भरून रुग्णालयात नेण्यात आले.

मुख्यमंत्री योगी यांनी मुख्य सचिव मनोज सिंह आणि डीजीपी प्रशांत कुमार यांना

घटनास्थळी पाठविले.

घटनेच्या कारणाचा तपास करण्यासाठी एडीजी आग्रा आणि अलिगढ आयुक्तांची

एक टीम तयार करण्यात आली आहे.

या घटनेत मरण पावलेलल्यांमध्ये बहुसंख्य महिला आणि चिमुकल्यांचादेखील समावेश आहे.

या घटनेबद्दल अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार,

चेंगराचेंगरीमागे कोणत्याही प्रकारच्या अफवाचे वृत्त नाही.

सुरक्षा रक्षकाने भक्तांना रोखले होते.

ज्यामुळे अनेकांनी श्वास कोंडल्याची आणि गुदमरल्याची तक्रार केली.

त्यानंतर एकच गोंधळ उडाला आणि चेंगराचेंगरी झाली.

रतीभानपूर येथील सिकंदराराऊ कोतवालीच्या फुलराई गावात

भोले बाबांचा सत्संग महोत्सव सुरु होता.

या सत्संग कार्यक्रमाला परवानगीही देण्यात आली होती.

एका अंदाजानुसार १.२५ लाख लोक या सत्संगसाठी आले होते

पोलिस आणि प्रशासनातर्फे बचावकार्य सुरू असून मृतदेहांचे पोस्टमॉर्टम केले जात आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/3-new-rules-implemented-across-the-country-from-today/

Related News