सातपुड्याच्या पायथ्याशी हिंस्र वन्यप्राण्यांचा वावर; शेतकऱ्यांची दहशत

प्राण्यांचा वावर; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

अकोला जिल्ह्यातील हिवरखेड नजिकच्या आदिवासी ग्राम चंदनपूर रेल्वे स्टेशन

येथे आज पहाटे वारा आणि वादळी पावसामुळे संपूर्ण परिसर अंधारात होता.

या संधीचा फायदा घेत हिंस्र वन्य प्राण्याने अमर सिंग मसाने यांच्या गोठ्यातील

Related News

गोऱ्यावर हल्ला करून त्याला ठार मारले.

गोरा बांधलेला असल्यामुळे तो स्वतःचा बचाव करू शकला नाही.

गेल्या अनेक महिन्यांपासून या भागात पट्टेदार वाघ, बिबट आणि इतर

हिंस्र प्राण्यांचा मुक्त संचार वाढल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

अंधारामुळे हल्ला नेमका वाघाने केला की बिबटने, हे निश्चित होऊ शकले नाही.

ग्रामस्थांनी वनविभागाला माहिती दिली असता, वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी हद्दीच्या

कारणावरून टोलवाटोलवी केल्याचा आरोप करण्यात आला.

अखेर काही वेळाने झरी येथील वन अधिकारी सोळंके यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा सुरू केला.

गावकरी आणि शेतकऱ्यांनी वन विभागाने त्वरित उपाययोजना कराव्यात,

तसेच नुकसानभरपाई लवकरात लवकर द्यावी, अशी मागणी केली आहे.

Related News