सातबारा, 8अ उतारा आता थेट व्हॉट्सअ‍ॅपवर! 1 ऑगस्टपासून राज्यभरात नवीन डिजिटल सेवा

सातबारा, 8अ उतारा आता थेट व्हॉट्सअ‍ॅपवर! 1 ऑगस्टपासून राज्यभरात नवीन डिजिटल सेवा

मुंबई – शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा! 1 ऑगस्टपासून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सातबारा,

8अ, फेरफार नोंदी आणि ई-रेकॉर्ड ही जमीनसंबंधित कागदपत्रे थेट व्हॉट्सअ‍ॅपवर मिळणार आहेत.

भूमी अभिलेख विभागाने ही सुविधा सुरु केली असून, यासाठी फक्त 15 रुपयांचे शुल्क आकारले जाणार आहे.

Related News

या सुविधेमुळे सेतू केंद्रांवरील गर्दी, दलालांची गरज आणि वेळेचा अपव्यय टळणार आहे.

प्रायोगिक स्वरूपात ही सेवा 15 जुलैपासून कार्यान्वित होणार असून, 1 ऑगस्टपासून संपूर्ण राज्यात लागू होणार आहे.

शेतकऱ्यांनी महाभूमी पोर्टलवर जाऊन आपली नोंदणी केल्यानंतर ही सेवा वापरता येणार आहे.

मोबाईलवर सूचना, कागदपत्रांची उपलब्धता आणि फसवणुकीपासून बचाव हे या सुविधेचे प्रमुख फायदे ठरणार आहेत.

Read Also :  https://ajinkyabharat.com/14-varshachaya-tarunachaya-hushariimu-rail-railway-aap-tala-shekado-pravashanche-pran-vachale/

Related News