Satara Doctor Case : ‘1 पुरावा मिळाला तर सोडणार नाही’, महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणी फडणवीसांचा इशारा

Satara Doctor Case

Satara Doctor Case : ‘पुरावा मिळाला तर सोडणार नाही’, महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणी फडणवीसांचा इशारा

साताऱ्यातील फलटण येथे एका महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याने (Satara Doctor Suicide Case) राज्यभर खळबळ उडाली आहे. या प्रकरणावरून राजकारण तापले असून, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी यावर थेट भूमिका मांडली आहे.

“जर कोणी डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली या प्रकरणात सहभागी असल्याचा पुरावा मिळाला, तर त्याला आम्ही सोडणार नाही. मात्र, या संवेदनशील विषयावर राजकारण करू नका,” असा इशारा फडणवीस यांनी दिला.

Related News

त्यांनी म्हटले की, एका तरुण डॉक्टरने आत्महत्या करणे ही अत्यंत दुःखद आणि गंभीर बाब आहे. विरोधकांनी या घटनेचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करणे हे चुकीचे आणि असंवेदनशीलतेचे द्योतक आहे.

फडणवीस यांनी आश्वासन दिले की या प्रकरणात दोषी कोण असेल, त्याच्यावर कठोर कारवाई होईल आणि कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही.

read also :  https://ajinkyabharat.com/donald-trump-china-relations-20/

Related News