“सरन्यायाधीशांच्या मातोश्रींचा स्पष्ट सूर : ‘बॅलेट पेपरच सुरक्षित, मतदारांचा विश्वास जपणं गरजेचं'”

सरन्यायाधीशांच्या मातोश्रींचा स्पष्ट सूर : 'बॅलेट पेपरच सुरक्षित, मतदारांचा विश्वास जपणं गरजेचं'

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाचे नवे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेणारे भूषण गवई यांच्याबाबत संपूर्ण देशात अभिमानाची लाट आहे.

अमरावतीच्या मातीतून आलेल्या गवई यांच्या मातोश्री कमलाताई गवई याही या गौरवाच्या क्षणी भावुक झाल्या.

पण याच वेळी त्यांनी निवडणूक प्रक्रियेबाबत एक ठाम मतही मांडलं – “देशात पुन्हा एकदा बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात.”

Related News

कमलाताई म्हणाल्या, “बॅलेट पेपर म्हणजे जनतेचा खरा कौल. आधी याच पद्धतीने निवडणुका होत असत

. ईव्हीएममुळे शंका निर्माण होतात. बाबासाहेबांनी जनतेला केंद्रस्थानी ठेवलं आहे,

तर मग त्यांच्या मतदानाच्या विश्वासाला तडे का द्यायचा?”

भूषण गवई उद्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदाची शपथ घेणार असून,

त्यांच्या मातोश्रींनी केलेल्या विधानामुळे बॅलेट पेपरविषयी सुरू असलेल्या चर्चेला नवा आयाम मिळालाय.

विशेषतः महाविकास आघाडी व इतर पक्षांकडून सातत्याने ईव्हीएमविरोधात प्रश्न उपस्थित होत असताना,

एका सरन्यायाधीशाच्या घरातून आलेला हा आवाज महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

याआधी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते उत्तम जाणकर यांनी बॅलेट पेपरच्या मागणीसाठी मोठं आंदोलन केलं होतं.

आता कमलाताई गवई यांच्या वक्तव्यामुळे सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या ईव्हीएम व बॅलेट पेपरवरील याचिकेच्या सुनावणीकडे देशाचे लक्ष लागून राहिलं आहे.

READ MORE NEWS

https://ajinkyabharat.com/dhavi-measure-worry-about-worry/

Related News