मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर व अमानुष हत्येच्या निषेधार्थ अकोल्यात शिंदे गटाच्या
शिवसेनेकडून फाशी आंदोलन करण्यात आले. या हत्येतील प्रमुख आरोपी वाल्मीक कराड व
इतर आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले.
Related News
ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का? सोशल मीडियावर निवडणूक निकालाचा खळबळजनक दावा व्हायरल
Met Gala 2026 : हाय फॅशनपेक्षा देसी मीम्सच ठरले सुपरहिट
आंबा खाल्ल्याने खरंच वजन वाढते का? तज्ज्ञांचा मोठा खुलासा
अकोल्यातील शहीद मदनलाल धिंग्रा चौकात झालेल्या या आंदोलनात संतोष देशमुख यांच्या हत्येचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला.
आंदोलनकर्त्यांनी वाल्मीक कराडसह सर्व आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली.
यावेळी प्रतिकात्मक फाशी देऊन निषेध व्यक्त करण्यात आला, तसेच कार्यकर्त्यांनी जोरदार
घोषणाबाजी करत संतोष देशमुख यांना न्याय मिळावा, अशी मागणी लावून धरली.
या आंदोलनात शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांसह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
सरपंचाच्या हत्येप्रकरणी त्वरित कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली.
Read more here :https://ajinkyabharat.com/self-tukaram-bidkar-yanchaya-smriti-sighar-dinimit-journalist-journalist-helmet-watp/
